vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

अमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव..

अमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव..

राज्य प्रतिनिधी -सांगली, – अमली पदार्थांची तस्करी सांगली जिल्ह्यात खपवून घेतली जाणार नाही, असा जाहीर इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा दिला.

अमली पदार्थविरोधी प्रबोधन स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, आय. टी. आय. च्या प्राचार्या मेघना जोशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंजाबसारख्या राज्यात अमली पदार्थांचे मोठे संकट आहे. आगामी काळात तरूणांना व्यसनाधीन करणे, सायबर युद्ध अशा प्रकारात युद्ध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर अमली पदार्थ तस्करांना कायद्याचा धाक, प्रबोधन आणि चिकित्सा व उपचार या त्रिसूत्रीने काम केल्याने सांगली जिल्ह्यात हे संकट रोखण्यात यश आले आहे. ही मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रार्थनेच्या वेळी परिपाठामध्ये अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा, व्याख्यान, लघुचित्रफीत या माध्यमातून बालवयापासून अमली पदार्थांपासून दूर राहण्याच्या संस्कार रूजवण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

अमली पदार्थ विरोधी मोहिमेचा प्रबोधन स्पर्धा एक महत्त्वाचा भाग आहे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या स्पर्धा सहा प्रकारात घेण्यात आल्या. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जनजागृती झाली, असे स्पष्ट करून त्यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी व विजेत्यांचे अभिनंदन केले.जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपले सदैव प्रयत्न असतील, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नववी आणि दहावीच्या मुलींना कर्करोगविरोधी लसीकरणासाठी प्रयत्न करू. रोजगार उपलब्धी आणि सर्वांना समान वागणूक, माणसा – माणसामध्ये समानता आदि बाबींवरही आपला भर राहील.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व या कार्यक्रमात गौरवण्यात आलेल्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 25 हजार रूपयांची मदत करणार असल्याचे घोषित केले. तसेच, स्पर्धेतील विजेत्या कलाकृतींची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, जाहिरात फलक, सिनेमागृह या माध्यमातून प्रसिद्धी करून व्यापक जनजागृती करण्याचे सूचित केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा ही मोहीम गेले साडेतीन महिने सुरू आहे. यामध्ये अमली पदार्थ दुष्परिणामांचा संस्कार विद्यार्थी दशेपासून शालेय स्तरावरून रूजवला जावा, यासाठी प्रबोधनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थी ही देशाची, शाळेची संपत्ती आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेतच अमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगितले गेले तर भावी पिढी सुरक्षित, सदृढ आणि निरोगी राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्ही स्तरावर याबाबत प्रबोधन व्हावे, असे सांगून त्यांनी विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने गेले तीन महिने गांभीर्याने काम केले. शाळा भेटीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महसूल, पोलीस विभाग तसेच वालचंद महाविद्यालयाच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने या संदर्भात पोर्टल तयार केले. चौकटीच्या बाहेर जावून संस्थात्मक यंत्रणा स्थापित करण्याचा प्रयत्न झाला. सांगलीचे हे मॉडेल राज्यात आदर्श ठरेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी वेळोवेळच्या आढावा बैठका व प्रोत्साहन यामुळे पोलीस विभागास बळ मिळून अमली पदार्थ विरोधी कडक कारवाया करण्यात यश आल्याचे सांगितले. तसेच, यापुढेही जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सर्व कार्यवाही करू, असे त्यांनी सांगितले.

अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा मोहिमेत महानगरपालिका संपूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले.

कार्यक्रमात जिल्हास्तरीय चित्रफीत, नाधमधुर कविता, डिजीटल पोस्टर, चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरणात प्राथमिक, माध्यमिक व आयटीआय विभागातील एकूण ३९ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, शिल्ड व रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. तसेच, “कंपोस्ट खड्डा भरा आणि आपलं गाव स्वच्छ ठेवा” या अभियानाचा पोस्टर अनावरण करून शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात रोपट्यास जलाभिषेकाने झाली. मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विषद केला.आयेशा नदाफ, चैतन्य लाळगे, तनया सूर्यवंशी यांनी मनोगतात अमली पदार्थांविरोधात प्रभावी संदेश दिला.

अमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम अंतर्गत हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभाग व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

राजेसाहेब लोंढे यांनी मानले. कार्यक्रमास विविध अधिकारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.अमली पदार्थविरोधी प्रबोधन स्पर्धांतील विजेते खालीलप्रमाणेशालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा –

गट क्रमांक – ३ ते ७ प्रथम : नंदिनी हेमंत चव्हाण, ए. ए. उपाध्ये हायस्कूल, कुपवाड, सांगली, द्वितीय आरोही भगवान सपकाळ, हिंदकेसरी ग. आं. विद्यालय, पुनवत, ता. शिराळा, तृतीय – साक्षी मल्लाप्पा तनंगी, जिल्हा परिषद शाळा, वळसंग, ता. जत

गट क्रमांक – ८ ते १० – प्रथम : अनुष्का धनंजय पुजारी, शांतिनिकेतन कन्या शाळा, सांगली, द्वितीय – प्रज्वल हेमराज बनसोडे, शासकीय निवासी शाळा विटा, तृतीय – कीर्ती जयवंत शिंदे, नेहरू विद्यालय, हिंगणगाव, ता. कडेगाव

गट क्रमांक – ११ ते १२ – प्रथम : तेजस्विनी नितीन कोळी, ग. रा. पुरोहित कन्या शाळा, सांगली, द्वितीय – सृष्टी संदीप सूर्यवंशी, क.भा. पाटील विद्यालय ऐतवडे बुद्रुक, तृतीय – साहिल मारुती पाटील, मंगलनाथ विद्यालय, मांगले ता. शिराळा

निबंध स्पर्धा –गट क्रमांक ३ ते ७ प्रथम – अर्पिता बसाप्पा पाटील – जि. प. शाळा हरिपूर नं. २, द्वितीय – तनया किरण सूर्यवंशी – न्यू इंग्लिश स्कूल, वांगी, ता. कडेगाव, तृतीय – राजवर्धन चंद्रकांत मोरे – जि. प. शाळा ९ करोली, ता. कवठेमहांकाळ

गट क्रमांक ८ ते १० – प्रथम – सोहम अधिकराव पाटील – अजितनगर घोरपडे विद्यालय, कळंबी, द्वितीय – अंजली मारुती गायकवाड – श्री गुरु बसव विद्यामंदिर संख, ता. जत, तृतीय – जान्हवी उत्तम अनुसे, जि. प. शाळा पांढरेवाडी, ता. आटपाडी

गट क्रमांक ११ ते १३ – प्रथम – आर्या उत्तम सोनवणे – राणी सरस्वती कन्या शाळा व ज्युनिअर कॉलेज, सांगली, द्वितीय – विद्या सुनील साळुंखे, पंचक्रोशी ज्युनिअर कॉलेज, बोरगाव, ता. तासगाव, तृतीय – साक्षी संदीप वरेकर – विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, इस्लामपूर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली,वक्तृत्व स्पर्धा – प्रथम – चैतन्य चंद्रकांत लाळगे आयटीआय सांगली, द्वितीय – प्रतीक सुभाष फोंडे आयटीआय तासगाव

निबंध स्पर्धा – प्रथम – पार्थ संदीप संकपाळ आयटीआय सांगली, द्वितीय – गणेश सुनील धामणकर आयटीआय सांगली, तृतीय – विनायक किशोर गोरे आयटीआय सांगली, उत्तेजनार्थ स्वप्निल संजय जाधव व अभय राजेंद्र सुतार आयटीआय सांगली

प्राथमिक शिक्षण विभाग खुला,चित्रफीत स्पर्धा – प्रथम – जयंत शांताराम देठे शिक्षक, आटपाडी बक्षीस रक्कम रुपये दहा हजार, द्वितीय क्रमांक अर्थ रविकिरण जावीर आटपाडी बक्षीस रक्कम रुपये सात हजार, तृतीय – सुशांत संभाजीराव पाटील, उपाध्ये गर्ल्स हायस्कूल मिरज बक्षीस रक्कम रुपये पाच हजार, उत्तेजनार्थ अमोघ अंबी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व जयकर जाधव वाळवा बक्षीस रक्कम रुपये दोन हजार रुपये

नादमधुर कविता स्पर्धा – प्रथम क्रमांक सूरज इसूप शिकलगार शिक्षक तासगाव बक्षीस रक्कम रुपये पाच हजार, द्वितीय क्रमांक जयकर आनंदराव जाधव शिक्षक वाळवा बक्षीस रक्कम रुपये तीन हजार, तृतीय क्रमांक राजेंद्र भोसले वाळवा बक्षीस रक्कम रुपये दोन हजार रुपये उत्तेजनार्थ गजानन बाबर विटा खानापूर व शंकर सोलंकर, जत बक्षीस रक्कम रुपये एक हजार रुपये

डिजिटल पोस्टर स्पर्धा – प्रथम – मैनुद्दिन भाडळेकर खानापूर बक्षीस रक्कम रुपये पाच हजार, द्वितीय -पार्थ जावीर आटपाडी बक्षीस रक्कम रुपये तीन हजार, तृतीय – सुशांत संभाजीराव पाटील उपाध्ये गर्ल्स हायस्कूल मिरज बक्षीस रक्कम रुपये दोन हजार रुपये, उत्तेजनार्थ अक्षय लिपारे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व अरविंद कोळी वाळवा बक्षीस रक्कम रुपये एक हजार रुपये

उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पुढील अधिकारी/अंमलदारांचा सत्कार

इस्लामपूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सतिश हिंदुराव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप हणमंत कळेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण जालिंधर पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मोहन धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक एकनाथ सुतार

विटा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धनंजय यशवंत फडतरे, पोलीस उपनिरीक्षक जयश्री आबासो कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम तुकाराम माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत गुलाब तांबेवाघ पोलीस कॉन्स्टेबल महेश अरुण संकपाळ

महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप रंगराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप नामदेव गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय चिंतामण कुलकर्णी, पोलीस नाईक नानासाहेब लक्ष्मण चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद युसुफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल मोहसीन मिरासाहेब टिनमेकर

०००००

संबंधित पोस्ट

दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक दितवाह  चक्रीवादळसदृश्य परिस्थिती समुद्रातून येतंय विध्वंसकारी संकट; IMD कडून ‘ साधगिरीचा इशारा, सतर्क राहा …

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळ पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात – प्रतिदिन सहा कोटींची तूट

vishwatmaklokswamivarta

रस्ते सुरक्षा अभियान विशेष लेख-

vishwatmaklokswamivarta

कवठेपिरानचा तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणपूरक उपक्रम विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

आपत्ती निवारणासाठी आता नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF) राहणार सज्ज आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मदतकार्यासाठी विशेष दलाची रचना   

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta