vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी-महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी-महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात ‘ई कॅबीनेट’ मध्ये होणारे निर्णय पोर्टलच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कारभार गतीमान आणि पारदर्शी करण्यावर भर दिला असून मंत्रिमंडळातील निर्णय लोकांपर्यंत तातडीने पोहचणे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. याबाबतचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केले.

‘ई-कॅबिनेट’ हा राज्य शासनाचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी करण्यासाठी हे संपूर्ण आयसीटी (ICT) सोल्यूशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या हरित उपक्रमांतर्गत स्मार्ट टॅब्लेट्सद्वारे कागदविरहीत मंत्रिमंडळ बैठक सहज पार पडू शकेल. या प्रणालीमुळे मा. मंत्र्यांसाठी अत्यंत सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होतील. त्याचबरोबर आवश्यक संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पॉइंट) पाहणे आणि घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत पुनरावलोकन करणे सोपे होईल. ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. मंत्रिमंडळ निर्णय आणि त्यासंबंधीचे संदर्भ शोधणे सहज शक्य होईल. ही प्रणाली पूर्णपणे डीजिटल स्वरूपात असून याद्वारे प्रत्येक टप्पा सहज पार पाडला जाईल. आतापर्यंत होत आलेल्या पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणारा प्रस्ताव ऑनलाईन अपलोड करणे, तो मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी आणि निर्णयासाठी सादर करणे, त्यावर अंतिम निर्णय व त्याबाबतच्या सर्व नोंदी ठेवणे, ही सर्व प्रक्रिया सहजरित्या पार पडणार आहेत. हा सुशासनाच्या पूर्ततेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे……

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

श्री सिद्धिविनायक मंदिरात  ‘माघी गणेश जयंती महोत्सवा’ची सुरुवात; गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर भव्य सोहळा..

vishwatmaklokswamivarta

अंबड मध्ये धान्याच्या काळ्याबाजारीवर मोठी कारवाई: काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 6.37 लाखांचा शासकीय/शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा जप्त; एकावर गुन्हा दाखल

मत्स्यव्यवसायिक श्री. शिवाजी कृ. पाटील यांची विशेष अतिथी म्हणून निवड…

vishwatmaklokswamivarta

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

सांबरवाडी, येवतेश्वर व अंबाणी येथील जिल्हा परिषद शाळांची* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून पहाणी* 

vishwatmaklokswamivarta