vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्येकलम १४४ जमावबंदी आदेश लागू

तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्येकलम १४४ जमावबंदी आदेश लागू

        सातारा, प्रतिनिधी तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याचे व अंत्यवितरिकीचे आवर्तन दि. ८ एप्रिल २०२५ पासून चालु असून माण वाढीव कालव्याच्या मुखाशी आवश्यक विसर्ग मिळण्यासाठी एक ते दीड महिन्यापासून उरमोडी धरण विभाग व कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांना लेखी व तोंडी मागणी दिलेली असून देखील कमी जास्त प्रमाणात कालव्याच्या मुखाशी विसर्ग मिळत आहे.

  सदर विसर्गामुळे माण वाढीव कालव्याचे आवर्तन पूर्ण करणे अडचणीचे होत आहे. त्यामूळे मागील आठ महिन्यापासून कालव्याच्या पुच्छभागाकडील गावांना आवर्तन काळात पाणी देणे शक्य झाले नाही. त्यामूळे तेथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून मोठ्या संख्येने शेतकरी कालव्यावर जमा होत आहेत. तसेच गावागावातील वाद उफाळून येत असल्यामूळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. असेच यापूर्वीही सन २०२३-२०२४, सन २०२४-२०२५ च्या अवर्तनावेळी शेतकऱ्यांचे वाद झालेले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांकडून कालवा अडवणे, कालवा फोडणे, यासारखे प्रकार झाल्याचे निदर्शनास आलेले आहेत. तसेच काही भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबत मागील दोन वर्षे सातत्याने म्हसवड पोलीस स्टेशन मार्फत माण कालवा परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. कालव्याची सुरक्षितता व कालव्यावर शेतकऱ्यांचे वाद होऊ नयेत म्हणून सन २०२३-२४ मध्ये विभागीय कार्यालयाचे व या कार्यालयाचे पत्रानुसार

दि. ०१/०४/२०२४ अन्वये सदर कालव्यांच्या हद्दीमध्ये जमावबंदी आदेश लागू करणेबाबत उपविभागीय दंडाधिकारी माण खटाव उपविभाग, दहिवडी ता. माण यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी कालव्याच्या क्षेत्रामध्ये जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

      श्री. महेश करचे यांनी दि. २१/४/२०२५ रोजी म्हसवड ता. माण तालुक्याच्या पूर्व भागास पाणी न मिळाल्याच्या निषेधार्थ जनावरांसह अर्धनग्न रास्ता रोको आंदोलन करणेबाबतचे निवेदन दिले, परंतू सदर प्रत्यक्ष जमावबंदी आदेश हे म्हसवड पासून साधारणत: १५ कि.मी. अंतरावर व फक्त कालव्याच्या क्षेत्रापूरते मर्यादीत असून त्याचा प्रभाव सदर आंदोलनाशी धरणे उचीत होणार नाही तसेच जमावबंदी आदेश हे खाली गावांना पाणी देत असताना वरील भागातील लोकांनी कालव्याचे पाणी वळवू अथवा चोरु नये अगर कालव्याचे नुकसान करणेत येऊ नये यासाठी लावण्यात आला असल्याचे, कार्यकारी अभियंता, कण्हेर कालवे विभाग क्रमांक २, करवडी यांनी एका पत्रकान्वये आवाहन केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सचिव आसिफ खानपठाण  यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..

vishwatmaklokswamivarta

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…जागतिक वारसा दिनानिमित्त उपक्रम

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेच्या लाभार्थ्यांनी-आधारकार्ड व बँक पासबुकची प्रत तहसील कार्यालयात जमा करावी..

जैन समाजभवन व साधुसंतांसाठी निवाऱ्याची आवश्यकता- ललीत गांधी अल्पसंख्याक कल्याण योजनांचा आढावाजैन व्यापाऱ्यांनी उद्योग-व्यवसायात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन..

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा  उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”

केस गळती आजाराच्या संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ येणार – प्रतापराव जाधव > केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली बाधित गावांना भेट > घाबरु नका, लवकरच निदान 

vishwatmaklokswamivarta