vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नीट परीक्षा २०२५-परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाची सज्जता,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

नीट परीक्षा २०२५-परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाची सज्जता,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- नीट २०२५ची परीक्षा रविवार दि.४ रोजी होत आहे. शहरातील ४९ केंद्रांवर १९ हजार ५०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने सज्जता केली असून या पुर्व तयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला.

   राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात National Eligibility Cu, Entrance Test (NEET) नीट २०२५ ही परीक्षा रविवार दि.४ रोजी दुपारी २ ते ५ या वेळात होत आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रांवर करावयाची सज्जता, उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला. उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल यादव, रविंद्र राणा, श्रीमती वैशाली जोशी तसेच सर्व परीक्षा केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सुचना दिल्या की, प्रत्येक परीक्षा केंद्र सीसीटीव्हीने जोडलेले असून प्रत्येक परीक्षार्थी प्रवेश करते वेळी त्याची तपासणी केली जाईल. कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कुणीही सोबत बाळगणार नाही याची खातरजमा केली जाईल. दुपारची वेळ असल्याने विद्यार्थी यांना सावलीची व्यवस्था केली जाईल. प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थी हा किमान एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचेल अशा बेताने घरुन निघेल. बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यासाठी बसस्थानक व रेल्वेस्थानक येथे सिटी बसेस ठेवण्याचे नियोजन सुरु असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

  वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून परीक्षा केंद्रावर एक मेडीकल टिम तैनात असेल. वाढत्या उन्हामुळे कुणालाही काही त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले. परीक्षा पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

०००००

संबंधित पोस्ट

ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नयेजिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन*घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबविणार

शस्त्र परवाना नुतीनकरण करुन घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

शालेय विद्यार्थ्यांत आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली,व्यसन परावृत्तीबाबत जागृती करणारा संयम उपक्रम- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची संकल्पना- शिक्षक प्रशिक्षणात 600 शिक्षकांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार

राजेगाव येथील शेतकरी उगले यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठींबा…

जागतिक मृद दिन -विशेष लेख- चला माती परीक्षण करुया, आपली जमीन समृद्ध करुया!

vishwatmaklokswamivarta