vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

भोकरदन, प्रतिनिधी-भोकरदन तालुक्यातील मौजे जवखेडा ठोंबरे येथील गट नंबर २५१ मधील असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या शॉर्टसर्किटमुळे शेतकरी महिला मुक्ताबाई सकलादी ढवळे यांच्या जमीनीतील मक्काची गंज्जी, पुंज,शाळु चारा, मक्का चारा इत्यादी वस्तुचे झालेले नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्यात येवुन नुकसान भरपाई देण्यात यावी, आदी मागण्याचे निवेदन भोकरदन महावितरणच्या उपअभियंत्याला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी दिले आहे.उपतालुकाप्रमुख ठोंबरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे जवखेडा ठोंबरे शिवारातील गट नंबर २५१ मध्ये मुक्ताबाई सकलादी ढवळे यांच्या मालकीची व ताब्यातील शेतजमीन क्षेत्र. ०.हे.४० आर मध्ये त्यांची सालाबादाप्रमाणे कुटुबांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी व मुलांच्या भवितव्यासाठी खरीप हंगाम मध्ये मक्का पिकाची लागवड केली व गट नंबर २३४ मधील शाळु चारा गट नबर २५१ मध्ये त्यांनी आणुन ठेवला होता. मक्काची गंज्जी,पुंज व मक्काचे पिक असे हा ३० एप्रिल रोजी दुपारी शॉटसर्किट होवून त्यांच्या शेतातील पिकाचे व चार्‍याचे न भरुन येणारे १ लाख ३० हजार रुपयेव केबल,शेती उपयोगी पीव्हीसी पाईप, विहीरीतील मोटार पाईप ज्यांची अंदाजे किमंत दहा हजार रुपये असे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी महिलेचा सहानुभुतीपुर्वक विचार करण्यात यावा. आपल्या कार्यालयाकडुन त्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ करण्यात येवुन त्या संबधीत गरीब शेतकरी महिलेस नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी उपअभियंता महावितरण भोकरदन यांच्याकडे केली आहे.

००००००

संबंधित पोस्ट

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

महापौर सौ.सुजाता पाटील यांनी घेतला घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील जलस्थितीचा आढावा

डोंगरी महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे*-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

पर्यटकांसाठी पुण्यातील नामांकित गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शनासाठी सहलीचे आयोजन

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट… दिवंगत पुरण कुमार यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta