vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

 मुंबई प्रतिनिधी ~ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे.जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे.त्यासाठी फुले चित्रपट हा देशभरात टॅक्स फ्री झाला पाहिजे अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.अंधेरी येथे ना.रामदास आठवले यांच्या साठी फुले सिनेमा चे स्पेशल स्क्रिनिंग दाखवण्यात आले.फुले चित्रपट पाहिल्यानंतर न.रामदास आठवले यांनी हा चित्रपट देशभरात पोहोचला पाहिजे.त्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा आणि फुले या चित्रपटाला करमुक्त करावे अशी आपली मागणी असून त्या बाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.

यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा रिपाइं चे शैलेश भाई शुक्ला; जतीन भुट्टा; प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले हा सिनेमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनात दाखवण्यात यावा अशी विनंती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी ना.रामदास आठवले यांना केली.त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.फुले सिनेमा सर्व सिनेमागृहात दाखवण्यात यावा .सर्वांनी फुले सिनेमा जरूर पाहावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले.

फुले चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी मुख्य भूमिका केलेली आहे.फुले सिनेमा मध्ये महात्मा फुले यांचे जीवनकार्य त्यांचे क्रांतिकारी योगदान अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात आले आहे असे कौतुक ना.रामदास आठवले यांनी केले.

00000000

संबंधित पोस्ट

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-· भारतीय क्रिकेट संघाचे ऐतिहासिक विजयाबद्दल विधान परिषदेत अभिनंदन· भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने क्रिकेट जगतात देशाचा अलौकिक गौरव

सरकारची मराठा-ओबीसी ऐक्याला धक्का देणारी भूमिका — डॉ. संजय लाखे पाटील; उपसमितीला पडताळणीचा अधिकार नाही

कल्याणमध्ये इमारत दुर्घटनेत ६ मृत्यू, ४ जखमी..

vishwatmaklokswamivarta

150 दिवसीय ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान 

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे  वाटप