vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निराधार, श्रावणबाळचे पैसे तात्काळ वितरीत करावेत-उपमुख्यमंत्री अजित पवार

निराधार, श्रावणबाळचे पैसे तात्काळ वितरीत करावेत-उपमुख्यमंत्री अजित पवार

      अमरावती, प्रतिनिधी: संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना केंद्राच्या निधीची वाट पाहू नये. राज्याने निधी तातडीने वितरीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

      आज श्री. पवार यांनी विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.

    श्री. पवार यांनी मनेरगा आणि इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या हिश्याच्या निधीची वाट पाहण्यात येते. मात्र यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास उशिर होत आहे. त्यामुळे केद्राच्या निधी वाट न पाहता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभ जमा करावा. डीबीटीमध्ये अडचणी येत असल्यास तातडीने आधार जोडणी करावी. निधी देण्यासाठी ३१ मार्च मूदत होती. त्यामुळे निधीचे तातडीने वितरण करावे.

     स्वस्त धान्य योजनेतून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेवून अंत्योदयचा लाभ देण्यात यावा. धान्य वितरीत करताना मेळघाट परिसरातील आदिवासींना धान्य प्राधान्याने वितरीत करण्यात यावे. जिल्हा नियोजनमधून पोलिसांना निधी देण्यात येत असून त्यामधून पोलिसांना आवश्यक असणारी वाहने आणि इतर साहित्य देण्यात यावे. यासोबतच गेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये चांगले काम होत आहे. यात सातत्य टिकवावे. यातून चांगले काम होईल, यासाठी लक्ष देण्यात यावे. जिल्हा नियोजनमधून करण्यात येणारी कामे वेळेत मंजुरी घ्यावी. तसेच ही कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे.

    अमरावती विमानतळाची धावपट्टी वाढवणे आणि या ठिकाणी रात्री विमान उतरण्याची सोय करण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे ही कामे तातडीने होण्यासाठी लक्ष द्यावे. सारथीच्या इमारतीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येत्या जून 2026 पर्यंत बांधकाम पूर्ण करावे. तसेच या ठिकाणी उत्कृष्ट सोयी सुविधांसह भोजन व्यवस्था आणि वाहनतळाची व्यवस्था असावी. तसेच कामगारांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश श्री पवारांनी दिले.

000000

संबंधित पोस्ट

आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ, पहिल्या दिवशी शैलपुत्री या रुपाची होत आहे आराधना.

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत… वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी

माजी सैनिकांना कौन्सिलिंगव्दारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण 

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, उद्यापासून नागपूरमध्ये , अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं आयोजन. 

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी