vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार- राज्‍य माहिती आयुक्त गजानन निमदेव

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार-  राज्‍य माहिती आयुक्त गजानन निमदेव..

 

राज्य प्रतिनिधी- गत 34 वर्षापासून पत्रकार ते संपादक म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेले गजानन निमदेव यांनी आज राज्य माहिती आयुक्त (नागपूर खंडपीठ ) पदाची जबाबदारी स्वीकारली. राज्य शासनाने त्यांची नुकतीच या पदावर निवड केली आहे. माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करु असे त्यांनी सांगितले. आज दिनांक ५ मे रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात त्यांनी कामकाजास प्रारंभ केला. कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी व पत्रकार बांधवांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. दैनिक तरुण भारत या मराठी दैनिकात त्यांनी पत्रकार, प्रशिक्षणार्थी उपसंपादक या पदापासून पत्रकारितेला प्रारंभ केला. जवळपास गेली पंधरा वर्षे संपादक म्हणून त्यांनी दैनिक तरुण भारतची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. नागपुरात काम करणाऱ्या बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाचा स्व. शक्तीकुमार संचेती स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांचा आप्पासाहेब पाडळकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सत्यजित गौरव पुरस्कार, नागपुरातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार यासह एकूण ७ पुरस्कारांनी निमदेव यांना सन्मानित केले आहे.

सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याची त्यांनी विशेष आवड जपली आहे. याच आवडीतून निमदेव यांनी सातत्याने 20 वर्षे स्तंभलेखन केले. याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी नि:शुल्क मार्गदर्शन केले, हे विशेष. हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. एमपीएससीच्या परीक्षांसाठी सात पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर स्वतंत्रपणे हजारपेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. आठशेपेक्षा जास्त अग्रलेख लिहिले आहेत. इंग्रजी आणि हिंदीतील साडेतीन हजार लेखांचे भाषांतर करण्याचा अनुभव त्यांनी संपादित केलेला आहे.

संबंधित पोस्ट

मोदी सरकारचा 2025 अर्थसंकल्प शेतकरी, महीला, युवा, कामगार, उद्योजकांना उन्नती देणारे व सर्वसामान्य मध्यवर्गीयांना दिलासा देणारे – रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

श्रीनारायण गुरूंच्या महासमाधी शताब्दी उत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन ,श्रीनारायण गुरूंचा एकतेचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की सर्व मानवांमध्ये समान दिव्य तत्व आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू..

vishwatmaklokswamivarta

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

गैरप्रकार रोखण्यासाठी डीबीटी व ऑनलाईन निवड प्रक्रिया- मंत्री जयकुमार गोरे

उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; ३७ तहसील आणि ४०२ गावं बाधित.८४,००० हून अधिक लोक प्रभावित; बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू.

vishwatmaklokswamivarta

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान राज्याच्या क्रीडा विकासासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta