vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

महारक्तदान शिबीरात 134 जणांचे रक्तदान…

महारक्तदान शिबीरात 134 जणांचे रक्तदान…

जालना प्रतिनिधी – सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम कृपेने महा रक्तदान शिबीराचे येथील संत निरंकारी मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होतेे. संत निरंकारी ंमंडळातर्फे 24 एप्रिल हा दिव बाबा गुरुचनन सिंह महाराज यांच्या आठवणी प्रित्यर्थ मानव एकाता दिवस म्हणून साजरा केला जातो. हे रक्तदान शिबीर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालले.या शिबीरात 134 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या शिबीराचा शुभारंभ (उद्घाटन) डॉ. नितीन पवार (जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना) व महात्मा विजय बोडखे (क्षेत्र संचालक छ. संभाजीनगर) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजकुमार पारसवानी (समन्वयक जालना आणि ज्ञान प्रवर्तक) तसेच डॉ. राजेंद्र गाढेकर (मुख्य जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना) यांच्यासह बहुसंख्येने पुरुष, महिला व बाल सेवेकर्‍यांची उपस्थिती होती.

युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी सत्यबोधाच्या माध्यमातून समाजाला समाज अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथांपासून मुक्त करुन नशमुक्ती, साधे विवाह आणि युवावर्गाला सकारात्मक विचारांशी जोडणे यांसारख्य लोककल्याणकारी अभियांनाची प्रेरक सुरवात केली. त्यांचे पावन मार्गदर्शन पुढे चालवत बाबा हरदेवसिंहजी यांनी रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको हा अमर संदेश देऊन रक्तदानाला मिशनच्या आध्यात्मिक सेवेचे अभिन्न अंग बनवले. हा संदेश आजदेखील प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयामध्ये सेवा आणि समर्पणाची प्रेरक ज्योत बनून तेवत आहे. हा दिवस चाचा प्रतापसिंहजी यांच्यासह त्या सर्व समर्पित बलिदानी संतांच्या पुण्य स्मृतिचे प्रतीक आहे, ज्यांनी मानव एकता, निःस्वार्थ सेवा आणि आध्यात्मिक जागृतीच्या मार्गावर चालत असताना आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. मानव एकता दिवस त्याच संतांचा दृढविश्वास व दृढसंकल्पाची प्रेरणा जीवंत करतो.

हे महाअभियान केवळ रक्तदान नसून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा करुणा, सेवा आणि एकत्वाचा संदेश जीवनात उतरविण्याचे सजीव माध्यम आहे. मानवता हाच सर्वोच्च धर्म होय. याच प्रेरणेने युक्त संत निरंकारी मिशन, सेवा आणि समर्पणाच्या पथावर निरंतर मानवतेचा मार्ग प्रशस्त करत आहे. या शिबीरासाठी डॉ. शामल गरड , शिवाजी मुजगुले (अंबड मुखी), जामखेड येथील सेवादल संचालक लखन चव्हाण, जालना संचालक सुनिल नांदोडे, रघुनाथ काळे, सुधाकर दळवी, सुनिल वाघ, किरण गरड, अनिल गुडला, सुधाकर दळवी, आरती डुरे, मनोज जाधव, विष्णु जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरुष, महिला व बाल सेवादलाने अथक परिश्रम घेतले .

—————————————–

संबंधित पोस्ट

महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. ॐ मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं कर्म बंधनः

कोणाही जीवाचा न घडो मत्सर -वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे ||

शिखर शिंगणापूर स्वयंभू शिवमंदिर…

दत्त जयंती निमीत्त श्री गुरुचरिञ पारायण सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

vishwatmaklokswamivarta

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’*

vishwatmaklokswamivarta

अडथळे दूर करून, बंध मजबूत करून: महिलांच्या कल्याणासाठी संवाद जागवणारा 10 वी आंतरराष्ट्रीय महिला परिषद..

vishwatmaklokswamivarta