vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा..

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी पाच वर्षे प्रतिक्षा यादी ठेवण्याची सोय केली आहे. सन २०२५-२६ या वर्षात पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री, शेळीपालक असे पर्याय निवडण्याची सोय देण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी https://ah.mhabms.com वर अर्ज करावा. तसेच AH-MAHABMS या मोबाईल ॲपवर सुद्धा अर्ज करता येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज दि.१ जून २०२५ पर्यंत करता येणार आहेत. अधिक माहिती वा तांत्रिक अडचणींसाठी १९६२ याता टोल फ्री क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते सायं.६ यावेळात संपर्क साधावा अथवा नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज मागविणे व लाभार्थी निवड प्रक्रियेचे वेळापत्रकही विभागाने जाहीर केले आहे. दि.२ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारणे, दि.३ ते ७ जून- रॅन्डमायझेशन पद्धतीने लाभार्थ्यांची प्राथमिक निवड, दि.८ ते १५ जून मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे, दि.१६ ते २४ जून पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पूर्ण करणे, दि.२५ ते २७ जून लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रातील त्रुटी दूर करणे, दि.२८ -३० जून कागदपत्रे अंतिम पडताळणी, दि.१ जुलै राखीव व दि.२ जुलै रोजी अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार करणे असा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला असून लाभार्थ्यांनी अर्ज करावे,असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनुकंपा नियुक्ती* *गरजू कुटुंबांच्या घरात एका क्षणात परतला आनंद*

रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पुणे येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे-जन आरोग्य सेवा गौरव पुरस्काराचे वितरण

vishwatmaklokswamivarta

जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटीचा प्रश्न थेट मुंबईत; उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर दखल ,परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन माइंड यांच्याकडून तक्रारीची दखल बंद बससेवा व प्रवाशांच्या तक्रारींची चौकशी होणार निवेदन जालना विभागाकडे वर्ग करून कार्यवाहीचा अहवाल मागविला…

आता भारत व युरोप यांच्यात युपीआयसह व्यवहार शक्य? आरबीआयकडून मोठी माहिती समोर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात कोरोना वाढता प्रभाव, एका दिवसात 65 नवे रुग्ण, मुंबईत 22 संक्रमित, पुन्हा लॉकडाऊन ?आरोग्य विभाग नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन