vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कृषी भागाची नऊ क्षेत्रिय कार्यालये झाली आयएसओ मानांकन*

*कृषी भागाची नऊ क्षेत्रिय कार्यालये झाली आयएसओ मानांकन*

सातारा प्रतिनिधी : शासनाच्या शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या ९ क्षेत्रिय कार्यालयांनी अभिलेख व्यवस्थापनासाठी ISO 9001:2015 हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त केले आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा हे राज्यातील पहिले 150 9001:2015 मानांकित कार्यालय ठरले आहे. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा हे राज्यातील एकमेव कार्यालय आहे ज्याच्या अधिनस्त असणारी ९ क्षेत्रिय कार्यालये ISO 9001:2015 मानांकित झाली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उपविभागीय कृषी अधिकारी, सातारा, कराड व वाई तसेच तालुका कृषी अधिकारी, सातारा, खटाव, कराड, पाटण वाई व जावळी या कार्यालयांना ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे कार्यालयीन प्रक्रियांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ आणि शासकीय सेवा पुरवठ्यात गुणवता सुनिश्चित होणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले आहे.

 हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन आहे. जे संस्थेच्या गुणवता व्यवस्थापन प्रणालीचे मूल्यांकन करते. या मानांकनामुळे संस्था त्यांच्या सेवा प्रक्रिया आणि अभिलेख व्यवस्थापनात सातत्य, पारदर्शकता आणि ग्राहक समाधान सुनिश्चित करतात. कृषी विभागासाठी हे मानांकन शेतकऱ्यांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी आणि कार्यालयीन कार्यप्रणाली सुधारण्यासाठी महत्वपूर्ण आहे.

अधिनस्त सर्व कार्यालयांसाठीही याच पद्धतीने ISO मानांकन मिळविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाची सेवा गुणवत्ता अधिक वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक प्रभावी सेवा मिळतील, असा विश्वासही श्रीमती फरांदे यांनी व्यक्त केला.

0000

संबंधित पोस्ट

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार: ‘भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करा’– आमदार टी. राजा सिंह यांचे प्रतिपादन१६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत अकोल्याचे ‘एकवीरा मैदान’ चैतन्यमय;संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ…

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

मुसळधार पावसातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या स्व. पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत…

मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम आझाद मैदानावर

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन