vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल..

 

मुंबई प्रतिनिधी -जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स (Mock Drill) राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यातील 16 ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आले.

मुंबई शहरामध्ये क्रॉस मैदान येथे मॉक ड्रिल घेण्यात आली. यावेळी सिव्हिल डिफेन्सचे अपर पोलीस महासंचालक प्रभास कुमार, गृहरक्षक दलाचे महासंचालक रितेश कुमार आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या ड्रिलमध्ये पोलीस, एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक, गृह रक्षक दल, लोहमार्ग पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक जिल्हा प्रशासन, एनएसएस, एनसीसी यांनी सहभाग घेतला. तसेच अणुशक्ती नगर येथे ब्लॅक आऊट मॉक ड्रिल झाले.राज्यात मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मॉक ड्रिल घेण्यात आले.

ड्रिलमध्ये सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला गेला. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

संबंधित पोस्ट

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत १०० टक्के कामकाज पूर्ण

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात जनगणना 2027 साठी जोरदार तयारी सुरू..

रोटरी इंटरनॅशनलचे दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुप्रसिद्ध नेते संगकू युन यांचा मुंबई दौरा संपन्न, भारत देशात समाजसेवेसाठी अनेक संधी…