vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क* *नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन*

*भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क* *नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन*

 

       *ठाणे, प्रतिनिधी* भारत-पाक सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्त यांनी संयुक्तपणे जिल्ह्यातील नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जावू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातही सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील विविध भागात मॉक ड्रील आयोजित करून कोणत्याही अप्रिय घटनेचा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे. जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि द्वेषपूर्ण संदेशांवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. भारत-पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे

  “ठाणे जिल्हा प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे,” असे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण,स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक- मुख्यमंत्री फडणवीस

vishwatmaklokswamivarta

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वोडाफोन आयडिया कंपनीवर 32 लाख रुपयांचा रायगड ग्राहक मंचात दावा दाखल…

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026बदलापूर क्रीडामय, राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन,बदलापूरमध्ये इनडोअर स्‍टेडियम उभे करणार -आमदार किसन कथोरे

शंभर फुटी तिरंगा, प्रा. शरद पाटील स्मृती उद्यानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन