vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठ्यात तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांनी रक्तदान केले.

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के, विधी अधिकारी श्रीमती वायाळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. डॉ. महेश लढ्ढा व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान विषयक प्रक्रिया पार पाडली. दुपार पर्यंत २५ जणांनी रक्तदान केले होते. रक्तदान सायंकाळ पर्यंत सुरु राहणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

जेष्ठ साहित्यिक कलाकार यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुधवारी हदगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता-प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत..

भारतदुर्गा मंदिर नवचेतना जागृत करून प्रेरणा देईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात भारतदुर्गा मंदिराचा शिलान्यास