vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कायदा सुव्यवस्थेसोबतच विकास कार्यातही पोलीसपाटलांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कायदा सुव्यवस्थेसोबतच विकास कार्यातही
पोलीसपाटलांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- कायदा सुव्यवस्था राखतांनाच गावाच्या विकासासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीत सहभागी होऊन पोलीस पाटलांनी आपले योगदान द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व पोलीस पाटलांना दिले.

पोलीस पाटील यांच्याशी आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.या बैठकीस पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, पैठण उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, वैजापूरचे उपविभागीय अधिकारी अरुण जराड, कन्नड तहसीलदार विद्याचरण कडावकर,सोयगावच्या तहसीलदार श्रीमती मनीषा मेने आदी मुख्यलयातून सहभागी झाले तर अन्य उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व पोलीस पाटील दुरदृष्य प्रणाली द्वारे जिल्ह्यातील तालुका पोलीस स्टेशनमधून सहभागी झाले.

पोलीस पाटलांची आपापल्या गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका असते. कायदा सुव्यवस्थेबरोबरच गावांमध्ये बालविवाह प्रतिबंध, कुपोषण निर्मूलन, स्मशानभूमीची सुविधा उपलब्धता, टँकरमुक्त गाव करण्यासाठी विहीर पुनर्भरण, जल पुनर्भरण यासारख्या उपक्रमातही पोलीस पाटील यांनी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांना सहकार्य करावे. पोलीस पाटलांनी ही प्रशासनास तसेच प्राथमिक स्तरावरून पोलीस प्रशासनास सहाय्य करावे असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सूचित केले.
०००००

संबंधित पोस्ट

जन्म / मृत्यु प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणा पत्रासाठी अफीडेव्हीट / नोटरीची अट रद्द करा.काँग्रेस माथाडी कामगारचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी घाटी दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांना निवेदन दिले 

नागरिक केंद्रीत ‘आपले सरकार २.०’ पोर्टल कार्यान्वित करावे  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे

vishwatmaklokswamivarta

प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित -चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या

vishwatmaklokswamivarta

इंडियाज टॅलेंट फायटसाठी जालन्यातील अवेश हमीद खान यांची निवड

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

स्वातंत्र्यदिन सोहळा-विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक- पालकमंत्री संजय शिरसाट