vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत असून, यासाठी राज्यभरातील ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) -२०२५ ही ऑनलाईन पद्धतीने २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या चाचणीसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले असून १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.

पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५१, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४, नगर पालिका/ परिषदांच्या २८० तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांच्या १२ हजार १४८, याशिवाय आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील २ हजार ४२१ आणि शासकीय विद्यानिकेतन मधील ५६ अशा एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती मागणी नोंदविण्यात आली आहे. यामधील १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय तर खाजगी संस्थांमधील १०,३२८ पदे मुलाखतीसह भरावयाची आहेत.

या पदांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या १४ हजार ३२० पदांचा, इयत्ता सहावी ते आठवीच्या १०,०१२ पदांचा, इयत्ता नववी व दहावीच्या पाच हजार ५१३ पदांचा तर इयत्ता ११ वी व १२ वीच्या ३६४ पदांचा समावेश आहे.

उमेदवारांना पदभरतीसाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी आवश्यक सुविधा ६ ऑगस्ट २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत लॉक करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांसाठी गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.

पदभरती प्रक्रियेशी संबंधित सूचना, मागण्या किंवा तक्रारी उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहनही शालेय शिक्षण आयुक्तांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला आढावा-मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

जनसंख्याशास्त्र, लोकशाही आणि विविधता’ हा नवभारताचा आत्मा- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नगरपरिषद, नगरपंचायत शाळांतील शिक्षक – कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित आमदार सुधाकर अडबाले यांचा विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सवाल एक ते दीड महिन्यात सकारात्मक निर्णय : मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन..

भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल*

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा – मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta