vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

लातूर( प्रतिनिधी: सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेमार्फत जीडीसी अँड ए परीक्षा 23 ते 25 मे, 2025 रोजी येथील श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय, शासकीय रूग्णालयासमोर, सिग्नल कँम्प, या परीक्षा केंद्रावर सकाळी 10 ते 01 आणि दुपारी 02 ते 05 या वेळेत घेण्यात येणार आहे. ज्या परीक्षार्थींना परीक्षेचे प्रवेशपत्र मिळालेले नाहीत अथवा मोबाईलव्दारे संदेश प्राप्त झालेले नाही अशा परीक्षार्थींनी स्वत:चा एक फोटो व पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग परवाना, अनुषंगिक ओळखपत्राची एक झेरॉक्स प्रत सोबत घेऊन येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावेत. अथवा परीक्षेच्या दिवशी एक तास अगोदर कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02382-245193 किंवा 9970714855(राहुल काळे) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन चिफ कंडक्टर जीडीसी अँड ए परीक्षा तथा जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे. परीक्षार्थींना कार्यालयाच्या ddr_ltr@rediffmail.com या ई-मेल आयडीवरही संपर्क साधता येईल, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनासाठी डायनींग टेबल दिले भेट *

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले – अपर मुख्य सचिव विकास खारगे

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक-उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा – खर्च निरीक्षक व्ही. कुमार

vishwatmaklokswamivarta

एका लग्नाची गोष्ट’-अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान