vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, प्रतिनिधी: पीक कर्ज नुतनीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पीककर्जाचे नुतनीकरण केल्यास शासनाच्या व्याज सवलत व नव्याने पीक कर्ज तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जूनपर्यंत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सन 2025-26 च्या वार्षिक आराखडामध्ये खरीप हंगामासाठी 1 लक्ष 56 हजार 400 खातेदांराना 1 हजार 500 कोटी लक्षांक ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत 21 हजार 468 शेतकऱ्यांना 247.59 कोटी कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. कर्जवाटपाचे प्रमाण नगण्य आहे असून शेतकऱ्यांना कर्ज वितरणास सुलभता व अडचणीचे निराकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शेतकरी सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले आहे. शेतकरी सहाय्यता केंद्रामुळे शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज मंजूर होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत पीक कर्जाचे नुतनीकरण केल्यास 10 टक्के वाढीव कर्ज बँकेकडून दिल्या जाणार आहे. शेतकरी बांधवानी 30 जूनपूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करुन केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत परतावा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेंतर्गत 20 रुपयामध्ये अपघाती मृत्यू विमा संरक्षण तर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेंतर्गत 436 रुपयामध्ये नैसर्गिक मृत्यू संरक्षण दिला जातो. या दोन्ही योजनेमध्ये प्रत्येकी दोन लक्ष विमा संरक्षण दिला जातो. ज्या लाभार्थ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला नसेल त्यांनी आपल्या जवळच्या शाखेमध्ये भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

शेतकरी बांधव मुख्यत: खरीप हंगामावर अवलंबून असल्याने त्यांचे उत्पन्नात वाढ होण्यासाठी पारंपारिक शेती ऐवजी आधुनिक शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच शेती उत्पादनांवर प्रक्रिया करुन बाजारपेठेची जोडणी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. यासाठी केंद्र व राज्य शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कृषी व्यवयास उभारणी व बाजार जोडणीसाठी शेतकरी व नवउद्योजकांना त्यांच्या उद्योजकाच्या प्रकल्प मुल्यांच्या 35 टक्केपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिल्या जाते. या योजनाचा शेतकरी व नवउद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण-· मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश· जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात-· मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका

vishwatmaklokswamivarta

संस्थाबाह्य संगोपनासाठी इच्छुक पालकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करावी- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाईकोकण महसूल विभाग आढावा बैठक..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांना-केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…

वारणा धरणात 28.62 टी.एम.सी. पाणीसाठा..