vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मान्सूनपूर्व काळात घ्यावयाची खबरदारी

मान्सूनपूर्व काळात घ्यावयाची खबरदारी

बुलडाणा, प्रतिनिधी: सामान्यतः मान्सून देशात 7 जूनपासून दाखल होतो. मात्र, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या माहितीनुसार यावर्षी मान्सून 1 जूनपासूनच सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील खबरदारीचे उपाय अवलंबणे आवश्यक आहे.

खबरदारीचे उपाययोजना : पावसादरम्यान आणि वीज चमकत असताना घराबाहेर जाणे टाळा. स्वतःच्या आणि आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी खालील मोबाईल अॅप्सचा वापर करा.> दामिनी अप- वीज पडण्याच्या घटनांपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी.> मेघदूत अप – हवामान आधारित शेती व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त.> सचेत अप – आपल्या स्थानानुसार आपत्तीपूर्व सूचना मिळवण्यासाठी मदत करते> भुकंप अप: भूकंप होण्यापूर्वी सूचना देणारे अॅप.

आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी वरील अप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यांचा वापर करावा. सर्व नागरिक व शेतकऱ्यांनी सजग राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बांधकाम साईटवरील कामगार सुरक्षा विषयक विशेष जागरुकता शिबीर संपन्न,बांधकाम कामगार सुरक्षेविषयी शिबीर आयोजित करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका..

vishwatmaklokswamivarta

समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा; समान हक्क व सन्मानावर भर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील शूरवीराच्या शौर्याचा गौरव: पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा – मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना विद्यार्थी आणि पालकांशीही साधला संवाद

फलटण तालुक्यात पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण योजनेचा शुभारंभ

पंढरपूर यात्रेसाठी थेट आगार/गावांतून आषाढी एकादशी निमित्त खास बसेस उपलब्ध