vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विकसित कृषी संकल्प अभियानाचे-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..             

विकसित कृषी संकल्प अभियानाचे-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..

ठाणे, प्रतिनिधी:- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात विकसित कृषी संकल्प अभियानाचे दि.29 मे ते दि. 12 जून 2025 या कालावधीत 15 दिवस राबविण्यात येणाऱ्या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सह्योगी अधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र ठाणे, डॉ. सुरेश जगदाळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ डॉ. सलील हंडे, डॉ.मयुरा गोळे, डॉ.संग्राम चव्हाण, डॉ.संजय कदम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, तहसिलदार रेवण लेंभे, तहसिलदार सचिन चौधर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा‍धिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न झाले. विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत दि.29 मे 2025 ते दि. 12 जून 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या 90 गावांमध्ये मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यातील दररोज 6 गावांमध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी जावून भेट घेण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना ही माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे.या पुस्तिकेमध्ये शेळीपालन, मूर घास कसा बनवावा, यशस्वी दुग्धव्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने करण्याबाबत, संकरित चारा लागवड कसा करावा, परंपरागत कृषी विकास योजना, सेंद्रीय शेतीकरिता जैविक खते व पीक संरक्षण औषधे, शास्त्रोक्त पध्दतीने वासरांचे आहार व्यवस्थापन, निकृष्ठ चाऱ्याची प्रत वाढविण्यासाठी खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान, लंपी चर्मरोगग्रस्त जनावरांची करावयाची सुश्रुषा, मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प कृषी मूल्य साखळी विकासाचा उपक्रम, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) योजनेचे स्वरुप, ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ओळख क्रमांक आदी विषयक माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी जनजागृती वाहनांद्वारे प्रसिध्दी करण्यात येत आहे.

या मोहिमेची मुख्य वैशिष्टे समृध्द शेतकरी राष्ट्रीय अभियानामध्ये खरीप पिकांसाठी नवीनतम तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देणे, नैसर्गिक (सेंद्रिय) शेती पध्दतींना प्रोत्साहन देणे, माती आरोग्य कार्डावर आधारित पीक निवडीचे मार्गदर्शन करणे, खतांचा संतुलित वापर करण्यास प्रोत्साहन देणे, आयसीटी साधने आणि आधुनिक उपकरणांचा वापर करुन स्मार्ट शेतीला प्राधान्य देणे, शेतकऱ्यांपर्यत सरकारी योजनांची व्यापक पोहोच सुनिश्चित करणे, कृषी ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक, पीक विविधीकरण आणि यंत्रावर आधारित शेतीचे मॉडेल, शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांमधील थेट संवाद, शेतकऱ्यांच्या नवोपक्रमांना प्रोत्साहन आदी विषयांवर शेतकऱ्यांसाठी ही जनजागृती सुरु आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन..

केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा एकतेचा संदेश • मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी • सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘सरदार 150 युनिटी मार्च’ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ग. दि. कुलथे यांना अभिवादन

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णयगोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी ४१४ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर,आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची तंत्र व शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ घेतली दखल