vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह येथे कर्मचारी भरती..

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह येथे कर्मचारी भरती..

            ठाणे, प्रतिनिधी :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांच्या आधिपत्याखालील धर्मवीरनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह, ठाणे आणि माजी सैनिक विश्रामगृह, ठाणे या दोन आस्थापनांवर शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी माजी सैनिक प्रवर्गातून कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.    वसतिगृहासाठी भरण्यात येणारे पद :- वसतिगृह अधीक्षक (पुरुष) – 01 (माजी सैनिक JCO प्रवर्गातून),

निवासी ड्युटी, राहण्यास १ BHK निवासस्थान, वयोमर्यादा – 35 ते 55 वर्ष, शैक्षणिक पात्रता – किमान SSC पाससंगणक ज्ञान, दुचाकी चालक परवाना आवश्यक, एकत्रित मासिक मानधन – रुपये 31 हजार 875/-.

विश्रामगृहासाठी भरण्यात येणारे पद :- स्वागत कक्ष सहायक – 01 (माजी सैनिक प्रवर्गातून JCO उमेदवारास प्राधान्य), अनिवासी ड्युटी, वयोमर्यादा – 35 ते 55 वर्ष, शैक्षणिक पात्रता – किमान SSC पास, संगणक ज्ञान, दुचाकी चालक परवाना आवश्यक, एकत्रित मासिक मानधन – रुपये 24 हजार 875/-.

या नियुक्ती कंत्राटी पद्धतीने अशासकीय संवर्गातून महाराष्ट्र शासन यांच्या सैनिक कल्याण विभाग, पुणे द्वारे वेळोवेळी निर्धारीत सेवा नियम तसेच एकत्रीत मानधनावर असतील. उमेदवारांनी अर्जासोबत माजी सैनिक ओळखपत्र, डिस्चार्ज बुक/सर्व्हिस पर्टीक्युलेर, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, अनुभवाचा दाखला तसेच रहिवाशी पुरावा जोडणे बंधनकारक राहील.

अर्ज जमा करण्याचा पत्ता – 1) सैनिकी मुलांचे वसतिगृह ठाणे, धर्मवीरनगर, नौपाडा, ठाणे (प) – 400604 तसेच 2) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे, रु.नं. ४०२, कलेक्टर ऑफिस, कोर्ट नाका, ठाणे (प)-४००६०१. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 09 जून 2025 असून निवड प्रक्रिया बुधवार दि. 11 जून 2025 रोजी सकाळी 1100 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक मो.9769664830 (वसतिगृह), 9246624105(अधीक्षक). यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मे. प्रांजळ जाधव (नि.) यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- ‘टेक वारी’तील ज्ञानाचा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी घेत आहेत ऑनलाईन लाभ

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाराष्ट्र’ देशाचे गुंतवणूक मॅग्नेट

एसआयआर कार्यक्रमाचा केंद्रीय उप निवडणूक आयुक्तांकडून आढावा* *मतदार यादीची अचूकता, बीएलओच्या कामाचे नियमित परीक्षण आणि कालमर्यादेचे काटेकोर पालन करावे* – *उप निवडणूक आयुक्त ग्यानेश भारती*

जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन

एमसीईडी’तर्फे अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गाकरिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात साजरा,पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली जलरक्षक शपथ..