vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा कारागृहात मार्गदर्शक शिबीर संपन्न

जिल्हा कारागृहात मार्गदर्शक शिबीर संपन्न

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणामार्फत गुरुवार दि. 29 मे 2025 रोजी सकाळी बुलढाणा जिल्हा कारागृहात येथे मार्गदर्शक शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बंद्याना नशामुळे होणारे दुष्परीणाम संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांचे ड्रग्ज मुक्त भारतासाठी ड्रग्ज जागरूकता आणि निरोगीपणा 2025 मधील निर्देशानुसार मार्गदर्शक शिबीर घेण्यात आले होते. शिबीराच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा सहदिवाणी न्यायाधीश सचिव नितीन पाटील उपस्थित होते. तसेच मानसोपचार तज्ञ डॉ. विश्वास खर्चे, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त गजानन घिरके, संदीप पांचाळ, अॅड. संदीप टेकाळे हे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.

शिबीरामध्ये डॉ विश्वास खर्चे यांनी कारागृहातील बंद्यांना नशा करण्याचे आरोग्यावर दुष्परीणाम, तसेच नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनी परावृत्त होण्याकरीता काय करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गजानन घिरके यांनी सुध्दा कारागृहातील बंद्यांना नशा करण्याचे आरोग्यावर दुष्परीणाम व नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती विपशनाव्दारे परत कसे सामान्य जिवन जगु शकते याबाबत मार्गदर्शन केले. विपशन्येचे छोटेसे प्रात्याक्षीक सुध्दा करून दाखविले. सदस्य पॅनल अॅड. संदीप पांचाळ व अॅड. संदीप टेकाळे यांनी NDPS या गुन्हयाविषयी माहिती देऊन मागदर्शन केले. अध्यक्ष नितीन पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांनी सुध्दा बंद्यांना नशामुक्ती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर शिबीराच्या प्रसंगी कारागृह अधीक्षक संदीप भुतेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मोहन पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टेकाळे, डॉ. मयुर पडोळ इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन मोहन पाटील यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

vishwatmaklokswamivarta

महापारेषण’ला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान

vishwatmaklokswamivarta

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.-  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

नवी मुंबईच्या महापौरपदी श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौरपदी श्री.दशरथ भगत विराजमान…

vishwatmaklokswamivarta

प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta