vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, प्रतिनिधी: नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर नाशिकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ.पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, रुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे हा रुग्णालय काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा येथे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर-आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास, आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

vishwatmaklokswamivarta

आरटीई” प्रवेशासाठी पालकांनीकोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई-शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी

vishwatmaklokswamivarta

शिवरायांचे दुर्गवैभव – आता जागतिक ठेवा!*

vishwatmaklokswamivarta

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

🇮🇳*’हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत गडचिरोलीत मॅरेथॉन व जनजागृती रॅली*

vishwatmaklokswamivarta

समुद्र किनारी समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन बुडण्याच्या स्थितीत असलेल्या पती-पत्नीचे प्राण  वाचविणाऱ्या रायगड पोलीस दलातील दोन्ही पोलीस अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती ऑंचल दलाल यांनी प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव