vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

        सांगली, प्रतिनिधी: संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर सांगली पाटबंधारे विभाग, सांगली अंतर्गत मध्यवर्ती सांगली पूरनियंत्रण कक्षाचे उद्घाटन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अभियंता दयानंद बगली, योगिता थोरात, सहाय्यक अभियंता श्वेता दबडे-पाटील व सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी पूरनियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून क्षेत्रीय स्तरावरून पाणीपातळी अहवाल देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावर्षीही पूरनियंत्रणाचे कामकाज उत्तमरित्या करण्यात येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पूरनियंत्रण कक्ष दि. 1 जून ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये अखंडित कार्यरत ठेवण्यात येत असून अधिक माहितीसाठी पूरनियंत्रण कक्षामधील दूरध्वनी क्र. 0233-2301820 व 0233-2302925 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

   पूरनियंत्रण कक्षाचे कामकाज हे प्रतिवर्षी 1 जूनपासून सुरू करण्यात येते. तथापि या वर्षी माहे मे मध्ये सुरू झालेल्या पावसामुळे दि. 26 मे 2025 पासूनच हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षात 126 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 24 X 7 हा कक्ष कार्यान्वित राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक संपन्न

महसूल यंत्रणेने लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमानतेने काम करावे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रासह 11 राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश…

नववर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय; आज 31 डिसेंबरला मद्य विक्री वेळेत शिथिलता अवैध मद्य विक्री, वाहतूक प्रकरणी तक्रार नोंदविण्याची आवाहन…

vishwatmaklokswamivarta