vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट-भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार..

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट-भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार..

मुंबई प्रतिनिधी:- भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचे वेगळे नाते आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारतात जपाननं मोठी औद्योगिक गुंतवणुक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर, पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, रोजगारनिर्मितीत मोलांचं योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यासाठी उद्योगपुरक वातावरण निर्माण करणं शासनाची जबाबदारी आहे. यापुढील काळात उद्योग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांच्या भेटीदरम्यान आज झालेल्या चर्चेवेळी केलं.

जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपानी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासह, उद्योगक्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. उद्योग, आर्थिक क्षेत्रांबरोबरंच दोन्ही सामाजिक, सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यरत जपानी कंपन्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडविण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. चांगले रस्ते, पुरेशी वीज, आवश्यक पाणी, सुरक्षित वातावरण आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे, ती पार पाडण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणयात येईल. सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तिथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल. जिथे तातडीने रस्तादुरुस्ती आवश्यक आहे तेथे काँक्रीटच्या रस्त्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.

पुण्यातील जपानी कंपन्यांना पायाभूत सुविधांबरोबरच रस्ते, वीज, पाणी दळणवळणासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. जपानी कंपन्यांच्या प्रश्नांसंदर्भात जपानी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोवत पुण्यात बैठक आयोजित करण्यात येईल. धोरणात्मक आणि करासंदर्भातील प्रश्नही सोडवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानच्या मुंबईतील महावाणिज्यदूतांना दिली. यावेळी मियावाकी उद्याने, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जायका, एस.टी.पी., पूर नियंत्रण अशा विविध प्रश्नांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. पुढील काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक चांगले होईल आणि भारत-जपान मैत्री आणखी दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्रिमंडळाने  घेतली शपथ…

vishwatmaklokswamivarta

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

कारखान्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी कारखाना मालकांना सूचना करा-: सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न

नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे-जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल-पोलीस अधीक्षक तुषार दोशी