vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 26 जुनपर्यंत अर्ज करा

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 26 जुनपर्यंत अर्ज करा

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्हास्तरीय सुब्रोता फुटबॉल कप, सबज्युनियर मुले, ज्युनियर मुले, मुली क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दि. 3 ते 5 जुलै दरम्यान विविध वयोगटाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, संघांनी दि. 26 जूनपर्यंत ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा व सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्या मार्फत 2025-26 या वर्षासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी सबज्युनियर 15 वर्षा आतील मुले क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू दि. 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनियर 17 वर्षाखालील मुले, मुली दि. 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी दि. 26 जुनपर्यंत करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपुर्ण नांव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नांव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिष्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने पाठवावा. 15 वर्षाआतील खेळाडूंकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या स्पर्धेत सहभागी 15 वर्षाआतील मुले व 17 वर्षा आतील मुले, मुली यांची स्पर्धा दि. 3 ते 5 जुलै 2025 रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी डॉ.जिवन मोहोड, राज्य क्रीडा मार्गदर्शक (फुटबॉल) यांचेशी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते उद्घाटन ..    महाराष्ट्रातून एकूण 400 खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा सहभाग 

vishwatmaklokswamivarta

आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे.

क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून घडतील उत्कृष्ट खेळाडू-कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर,बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलात उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ

राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा 2025-26 चे अमरावती येथे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजितप्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीर 🏞️🌊 श्रीनगरच्या आयकॉनिक डल लेकवर “खेळो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हल” जल्लोषात!