vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाज्योती’ची ऑनलाईन प्रशिक्षण योजना लोकप्रियतेच्या शिखरावर  – मंत्री अतुल सावेजेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नव्याने अर्ज करण्यासाठी 20 जूनपर्यंत मुदतवाढ..

‘महाज्योती’ची ऑनलाईन प्रशिक्षण योजना लोकप्रियतेच्या शिखरावर  – मंत्री अतुल सावे,जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नव्याने अर्ज करण्यासाठी 20 जूनपर्यंत मुदतवाढ..

ठाणे, प्रतिनिधी- राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्यामार्फत जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांचा मोलाचा पुढाकार लाभला आहे. ही योजना राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहून मार्गदर्शन केले आहे.

सन 2025-27 सत्रासाठी 15 मे 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यभरातून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर किंवा नागपूर येथील महाज्योतीच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करता येतो. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अर्जाची अंतिम मुदत आता 20 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळून त्यांच्या यशाची शक्यता अधिक बळकट होईल, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे.

 इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी सांगितले की, ‘महाज्योती’तर्फे जेईई/नीट व एमएचटी-सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सूवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वरील परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी या सूवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले आहे.

000000000

संबंधित पोस्ट

नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं यांना सुखरूप बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य-उपमुख्यमंत्री अजित पवार औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय, संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन- मंत्री अतुल सावे प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस..

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्तेखरपुडी येथे नीट, जेईई परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न  

इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी,शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वे लवकरच आपली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार

vishwatmaklokswamivarta