vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थींचेतुरची येथे सोमवारी दीक्षांत संचलन…

नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थींचेतुरची येथे सोमवारी दीक्षांत संचलन…

        सांगली, प्रतिनिधी : नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थी सत्र क्र. १० यांचा दीक्षांत संचलन समारंभ सोमवार, दि. 9 जून 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके प्रविणकुमार पडवळ हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सांगली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची चे प्राचार्य धीरज पाटील यांनी दिली.

     नवप्रविष्ठ महिला पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्र. 10 यांचे प्रशिक्षण सत्र दि. 10 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झाले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निवड झालेल्या 481 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश असून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी 39 टक्के महिला प्रशिक्षणार्थी पदवीधर व 5 टक्के पदव्युत्तर आहेत. नऊ महिन्याच्या कालावधीत त्यांना आंतरवर्गात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि स्थानिक विशेष कायदे, फॉरेन्सीक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र तसेच बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव, ऑब्स्टॅकल, जमाव नियंत्रण, योग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीसांनी जनतेप्रती संवेदनशील बनावे याकरिता ‘भावनिक प्रज्ञावंत पोलीस’ हा विषय समाविष्ठ करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थीना परिपूर्ण पोलीस बनविण्यासाठी CCTNS, AMBIS, E-Learning, Computer व Traffic Management या पूरक अभ्यासक्रमांचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

हरवलेल्या मूकबधीर बालकाच्या कुटुंबाचा शोध जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बालक कुटुंबाकडे सुपुर्द

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..! विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

विद्यार्थ्यांच्या 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाकडून आवाहन*

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-उष्माघात (Heat Stroke)#उष्माघात 

जनकल्याण यात्रेचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*    *मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे होणार सातारा जिल्ह्यात विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा जागर*