vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शाहिरांचा पोवड्याने दुमदूमली सातारा राजधानी! सातारा येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते शाहिरी महोत्सवाचे थाटात उदघाटन

शाहिरांचा पोवड्याने दुमदूमली सातारा राजधानी! सातारा येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते शाहिरी महोत्सवाचे थाटात उदघाटन

सातारा प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने श्री शाहू कलामंच, सातारा या ठिकाणी शाहिरी महोत्सवाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.

शाहिरी महोत्सवाला प्रेक्षकांचा रसिकांचा चांगला प्रतिसाद असून सातारकरांनी या शाहिरी महोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

याप्रसंगी सातारा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बापट, राज्य सांस्कृतिक पुरस्कार मान्यवर शाहीर राजू राऊत, तसेच शाहीर अवधूत विभुते, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य श्री पंकज चव्हाण, सांस्कृतिक कार्य संचालनालायचे कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ उपस्थित होते.

या शाहिरी महोत्सवाची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री, ॲड. आशिष शेलार यांची आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. सांस्कृतिक कार्य संचालनालय संस्कृतीचे जतन व संवर्धन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा सातारा जिल्ह्यामध्ये शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शाहिरी व संगीतावर आधारित असा भव्य सांस्कृतिक महोत्सव ९ ते ११ जून, २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ६:३० वाजता शाहू कलामंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या प्रथम पुष्पाची सुरुवात युवा शाहीर प्रदीप सुतार, पुणे यांच्या पोवड्याने झाली. त्यानंतर शाहीरा तृप्ती सावंत, कोल्हापूर व शाहीर आलम पाटवेगार, बागणीकर यांचे सादरीकरण झाले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाहिरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये शाहीर अंबादास तावरे, शाहीर देवानंद माळी, शाहीर राजू राऊत, शाहीर दादा पासलकर, शाहीर अवधूत विभूते, शाहीरा सीमा पाटील, शाहीरा अनिता खरात यां सारख्या जेष्ठ शाहिरांचा सहभाग होता. या परिसंवादमध्ये शाहिरी समोरील आव्हाने, शाहिरीतील बदल, परंपरा, इतिहास, आजची शाहिरी, संवर्धन अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मान..

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते कोलकाता येथे ‘स्वच्छ मोबाईल ॲप’चे भव्य लोकार्पण 🇮🇳📱🧹

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

vishwatmaklokswamivarta

नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थींचेतुरची येथे सोमवारी दीक्षांत संचलन…

vishwatmaklokswamivarta

माळशेज घाटात सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी एक महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

विधानसभा लक्षवेधी सूचना :बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर