vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

 राज्य लातूर प्रतिनिधी: जिल्हा प्रशासनामार्फत वृक्षारोपण मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वटपौर्णिमेचे औचित्य साधून प्रत्येक कुटुंबाने किमान १० झाडे लावावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले होते. वन विभागामार्फत साखरा येथील विलासराव देशमुख वन उद्यानात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत ५० वडाची रोपे लावून या उपक्रमाला सुरुवात झाली.

रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सहायक वनसंरक्षकवैशाली तांबे, वृक्षारोपण मोहिमेत सहभागी सुनंदा जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे, श्रीमती नागरगोजे, वनपरिमंडळ अधिकारी नीलेश बिराजदार, टी. एस. चिल्ले, पी. टी. देवकरण, वनरक्षक महेश पवार, बालाजी पाटील, गोविंद घुले, धम्मसागर कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाची वटपौर्णिमा वडाची झाडे लावून साजरी करण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते साखरा येथील विलासराव देशमुख वन उद्यानात वडाचे झाड लावून झाली. यावेळी ५० महिलांनीही वडाची झाडे लावून या झाडांची पूजा केली.

*****

संबंधित पोस्ट

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिताजड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी..

१५० दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर व अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी स्विकारला सत्कार

जातपडताळणी समित्यांच्या अस्तित्वावरून विखे पाटील लक्ष्यावर..ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा जात पडताळणी समित्या संदर्भातील सल्ला हा असंविधानिक व बेकायदेशीर असून ते सकल मराठा समाजाची परत परत फसवणूक करत असल्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत

मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम  पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे..