vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी टँकर मंजूर

        बुलडाणा प्रतिनिधी: पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

नागझरी येथे 1 हजार 18 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 16 हजार 360 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मुरूड तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत महसुल शिबिरांचे आयोजन..

राज्यातील पहिला अभिवंदन सोहळा-मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा- ना.उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

धारावी पीएमजी येथील मारुती मित्र मंडळ यांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

बारामती विधानसभा पोटनिवडणुकरिता २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भय व सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

vishwatmaklokswamivarta