vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या 12 वाहनांचे लोकार्पण

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या 12 वाहनांचे लोकार्पण

जालना, प्रतिनिधी : जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 1 कोटी 82 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. या निधीतून पोलिस विभागाने एकुण 12 वाहने घेतली यात महिंद्रा स्कॉर्पिओ, बंदोबस्तासाठी मोटारगाड्या आणि पाण्याचे टँकर यांचा समावेश आहे. पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शनिवार दि.14 जुन 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता पोलिस कवायत मैदानावर नवीन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

  यावेळी खासदार डॉ.कल्याण काळे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलिस विभागाच्या वाहनांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. तसेच पोलिस विभागाच्या वाहनांनी यावेळी पथसंचलन देखील केले.

 

 

 

-*-*-

संबंधित पोस्ट

निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा थाटातजिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘मिशन परिवर्तन’ स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग….

vishwatmaklokswamivarta

कुणबी प्रमाणपत्रासाठी नवीन नियम लागणार..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारणार- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने  दादर येथील टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर  धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले

vishwatmaklokswamivarta

११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठकाजिल्ह्यातील एकही सुशिक्षीत तरुण बेरोजगार राहणार नाही  – मंत्री मंगलप्रभात लोढा* रोजगार मेळावा उत्साहात संपन्न