vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी२३ जूनपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी२३ जूनपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन २०२५-२६ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत ९ क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (५० टक्के) व कौशल्य चाचणी (५० टक्के) प्रक्रियेअंतर्गत विहीत निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रिया चाचण्यांसाठी खेळाडूंनी नाव नोंदणी दिनांक २३ जून २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली येथे करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

   प्रवेश प्रक्रियेसाठी अटी व शर्ती – सरळ प्रवेश / कौशल्य प्रवेश चाचणी – ७ जुलै २००६ नंतर जन्मलेले व ८ जुलै २०२५ रोजी पर्यंत १९ वर्ष पूर्ण झालेले खेळाडू. या चाचण्यांकरिता राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्राविण्य अथवा सहभाग प्राप्त खेळाडूंनी संबंधित स्पर्धेचे प्राविण्य /सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इत्यादी माहिती चाचणीस्थळी आणणे बंधनकारक आहे. सोबत आवश्यक कागदपत्रे (मूळ प्रत व झेरॉक्स प्रत) – खेळाडूचा जन्माचा दाखला, राज्यस्तर स्पर्धा सहभाग / पदकप्राप्त /राष्ट्रीयस्तर सहभाग/ पदकप्राप्त प्रमाणपत्र, आधार कार्ड. हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स या खेळासाठी सरळ प्रवेश व कौशल्य प्रवेशासाठी विभागीय चाचणीचा दिनांक 26 व 27 जून 2025 असा आहे. अधिक माहितीसाठी आरती हळींगळी ( ८४११९४२४२४) व मधुरा सिंहासने (८६५२७१३४५६) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

विजयी भव, दिव्या..!’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वचषक बुध्दीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दिव्या देशमुखला शुभेच्छा!

नमुंमपा चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेच्या पुरुष गटात नागपूर तसेच महिला गटात पुणे विजयी* 

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्राकरिता इच्छुक प्रशिक्षकांना ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

“मिशन लक्ष्यवेध” जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित

माटुंगा जिमखाना इथं झालेल्या आयडीसीएच्या तिसऱ्या टी१० महिला डेफ प्रीमियर लीगमध्ये मुंबई स्टार्सने दिल्ली बुल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 🏏

vishwatmaklokswamivarta