vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबई प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आणि पुणे घाट, सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१८ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात २९.२ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात २१.७ मिमी, पालघर २१.१ मिमी, रत्नागिरी १९.५ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९.१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १३.६, रायगड २१.७, रत्नागिरी १९.५, सिंधुदुर्ग १९.१, पालघर २१.१, नाशिक ३.१, धुळे ०.३, नंदुरबार ६.५, अहिल्यानगर ०.४, पुणे ६, सोलापूर ०.२, सातारा ८.१, सांगली ३.२, कोल्हापूर १३.९, जालना ०.१, बीड ०.२, धाराशिव ०.२, नांदेड ०.४, परभणी ०.२, हिंगोली ०.६, बुलढाणा ०.१, अकोला ०.२, अमरावती ०.५, यवतमाळ ०.२, वर्धा ०.९, नागपूर ०.२, भंडारा १.६, गोंदिया ३.८, चंद्रपूर ०.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात २.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भिंत पडून व्यक्ती जखमी झाली. नागपूर जिल्ह्यात औद्योगिक रिऍक्टरचा स्पोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर सहा व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात आगीच्या घटनेत दोन व्यक्ती जखमी तर सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघातात दोन व्यक्ती जखमी आणि वीज पडून एक प्राण्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

 

०००

संबंधित पोस्ट

मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार; पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती• बालशिवबासह जिजाऊ पुतळ्याच्या जागेची पाहणी

vishwatmaklokswamivarta

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन,बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल !- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक  

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी ‘समाधान समारोह’ विशेष लोक अदालत वादांचे सलोख्याने निराकरण करण्यासाठी पक्षकारांना सहभागाचे आवाहन

वॉकेथॉनमध्ये चालले हजारो नागरिक जलसंवर्धनाचा केला निर्धारपाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक थेंब जिरवा ; जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta