vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कृषी सखींचे ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात

कृषी सखींचे ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात

सातारा प्रतिनिधी – राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत सातारा जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा व जावळी तालुक्यातील निवड केलेल्या कृषी सखींचे ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव ता. जि.सातारा येथे सुरुवात झाली आहे

 प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आत्मा प्रकल्प संचालक अजय शेंडे यांनी नैसर्गिक शेती अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये दोन वर्षाच्या कालावधीमध्ये योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबी, घटक, कृषी सखींचे कामकाज या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री. राहुल माने, प्रकल्प उप संचालक आत्मा सातारा यांनी सेंद्रिय शेती गरज व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ. संग्राम पाटील, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव यानी माती परीक्षण महत्व, माती नमुने तपासणीसाठी कसे काढावे याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रात्यक्षिकाद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने माती नमुने कसा काढावा हे करून दाखविले.

श्री. भूषण यादगीरवार, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव यांनी देशी गोवश बाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १७ ते २१ जुन २०२५ कालावधीत कृषी सखींना नैसर्गिक शेती बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेतावरच सेंद्रीय निविष्ठा कशा तयार कराव्यात व त्यांचा वापर या विषयी सादरीकरण, प्रात्यक्षिक द्वारे प्रशिक्षित करणेत येणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवास शुल्क विषयक घेतला आढावा

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया उद्योगांना मोठे अनुदान10 टन क्षमतेचे तेल काढणी युनिट, मिनी ऑईल मिल, 250 मे. टन गोदाम व कडधान्य प्रक्रिया-पॅकेजिंग युनिटसाठी अर्जाची मागणी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट

महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी – सभापती प्रा. राम शिंदेकर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शिबिर संपन्न 

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी—-मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे