vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुण्यात खडकवासला धरण तुडुंब,धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 पुण्यात खडकवासला धरण तुडुंब,धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने खडकवासला धरणातून  पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातून 2000 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठी विविध ठिकाणी सायरन वाजवून नदीपात्रात येऊ नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे.

खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून 19 जून रोजी दुपारी 1 वाजता 2 हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या  विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे

मावळ, लोणावळा, कामशेत या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसत आहे.

00000

संबंधित पोस्ट

एल्डर लाईन – १४५६७; ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 अल्पवयीन मुलांनी अश्लील VIDEO दाखवत केले मुलीवर अत्याचार…

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन 

कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठक,शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस -पार्टी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र अजित दादा पवार साहब व मा. कैबेनेट मंत्री आदरणीय नेता नवाब मालिक साहब व युवा आमदार मा. सौ. सनामालिक शेख साहिबा व मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ टी कांबले साहब यांच्या मार्गदर्शनाखाली धारावी विभागातून सभासद नोंदणी अभियान…

विधान परिषद प्रश्नोत्तरे-कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर