vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा…

राज्य प्रतिनिधी : राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम असून कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत वीज पडून, पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे राज्याच्या आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे.

पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी – १५,०९२ क्युसेक, बंडगार्डन बंधारा पुणे – २४,४१६ क्युसेक, भीमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण – ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा – ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून २२,३४५ क्युसेक, सीना नदी – सीना धरणातून २८९ क्युसेक विसर्ग करण्यात आल्याचे राज्याच्या आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बोरघर, वावे, तर्फे, नातू, चिंचवली या रस्त्यांवरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी, अंगणवाडी, पन्हाळे, फणसूर रस्त्या येथील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आहे.

चिंचगर, कोरेगाव, भैरवी रोडवरील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर-चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे, तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघरमध्ये ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक ३१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित पोस्ट

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार• एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी..

अमरनाथ यात्रेला भक्तांचा जत्था रवाना..

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

नगरपरिषद व नगरपचांयत क्षेत्रात2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांविषयी शासन संवदेनशील*  *येणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा**- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अधोरेखित, यामुळे एआय-फर्स्ट पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि उच्च-मूल्य असलेल्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल विशाखापट्टणममध्ये गुगलने 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा केली – विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत एआय-चालित सेवांना चालना देण्यासाठी भारतातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे

vishwatmaklokswamivarta