vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळनवीन योजना सुरु झाल्याचा सोशल मीडिया संदेश, कथित दलालांपासून सावधान

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळनवीन योजना सुरु झाल्याचा सोशल मीडिया संदेश, कथित दलालांपासून सावधान

जालना, प्रतिनिधी:- मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी डिलीव्हरी बॉय, वाहन कर्ज आदि नवीन योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या प्रकारची अफवा सोशल मीडिया तसेच कथित दलालाद्वारे पसरविल्या जात आहे. तरी अशा प्रकारच्या कोणत्याही नवीन योजना सुरु करण्यात आलेल्या नसल्याने या अफवांपासून तसेच आर्थिक फसवणुकीपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन संचालक शाह आलम खान व जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त निगम यांच्याकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज, सुक्ष्म पतपुरवठा कर्ज अशा प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात. सद्यस्थितीत शैक्षणिक कर्ज योजना ही एकमेव चालु आहे तर बाकीच्या योजना पुढील आदेशापर्यंत बंद आहेत. तरी अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडू नये तसेच कोणी आर्थिक फसवणुक करीत असल्यास संबंधित व्यक्तीविरुध्द जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करावी. जेणेकरुन आपली व इतर नागरिकांची फसवणूक होणार नाही. जालना शहरातील दुखी नगर, मिल्लत नगर, तट्टूपुरा आणि कुचरवटा आदि वसाहतीमध्ये काही महिला कर्ज मंजूर करुन देते म्हणून इतर महिलांकडे पैशांची मागणी करीत आहेत. अशा आशयाची तक्रार संचालक शाह आलम खान यांच्याकडे प्राप्त झाली आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

vishwatmaklokswamivarta

बेरोजगारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !बिनशर्त माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा – सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा..

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते इंगोले नगरमधील नागरिकांना जागेची सनद बहाल स्वमालकीची जागा असल्याची सनद मिळाल्याने पट्टेधारकांच्या डोळ्यात आनंदाश्रू; ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत विशेष मोहीम

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ; वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा- सभापती प्रा.राम शिंदे• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम आणिविद्यापीठ इमारत १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या बैठकीत सूचना..