vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता-प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत..

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता-प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत..

        छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या तसेच १२ वी नंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, विधी इ. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश व इतर लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागसवर्ग, विशेष मागसवर्ग व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग या विविध प्रवर्गाच्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठीचे अर्ज समिती कार्यालयात सादर केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व दि.२६ जून ते ४ जुलै पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिर्त मार्फत यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. ऑनलाईन अर्जाची हार्डकॉपी आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात त्वरीत सादर करावेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जावर समितीकडून तात्काळ कार्यवाही करुन संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी या अगोदर समितीस अर्ज सादर केलेले आहेत व त्यांच्या प्रकरणामध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकरणातील त्रुटी पूर्ततेसाठीचे शिबिराचे आयोजन कार्यालयात करण्यात आले आहे. शिबिरात सदर त्रुटीची पूर्तता सादर करण्यात यावी.असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन

एमएचटीसीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील

vishwatmaklokswamivarta

शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा आणि समन्वयाने 100%उद्दिष्ट पूर्ती करा– जिल्हाधिकारी किशन जावळेपीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा-

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात संपन्न

vishwatmaklokswamivarta