vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन

जालना प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वच्या अनुषंगाने दि. 26 जुन ते 4 जुलै 2025 या कालावधीत राज्यातील अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील मागासवगीय विज्ञान शाखेतील सर्व मागासवगीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणत्र मिळण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती जालना मार्फत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष मोहिमेनिमित्त दि. 26 जुन 2025 रोजी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने 163 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सीईटी तसेच इयत्ता अकरावी, बारावी विज्ञान शाखेतील 2025-26 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. अर्जदारांची प्रकरणे त्रुटी पुर्ततेअभावी समितीकडे प्रलंबित आहेत अशा अर्जदारांना लेखी पत्र व ई-मेल व दुरध्वनीव्दारे त्रुटी पुर्ततेबाबत कळवूनही अर्जदारांनी अद्याप त्रुटीची पुर्तता केलेली नाही अशा अर्जदारांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. असेही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार साजारा

vishwatmaklokswamivarta

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देणार; ५०० कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून कार्यवाही– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ