vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण.

मुंबई, प्रतिनिधी : कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते २८ जून २०२५ रोजी सकाळी ११:५० वाजता होणार आहे. या सोहळ्याकरिता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध विकास कामांमध्ये रेल्वे स्टेशन चित्रीकरण स्थळ, नवीन वाडा, चाळ, मंदिर, अंतर्गत रस्ते, दोन वस्तीगृहे इत्यादी कामांचा समावेश आहे. या कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. भविष्यातील बदलत्या तंत्रज्ञानाचा कल लक्षात घेता चित्रनगरीमध्ये सुसज्ज अशा पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास तसेच भूमिपूजन समारंभास चित्रपट क्षेत्राशी आणि नाट्य क्षेत्राशी निगडित कलाकार व मान्यवर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीमध्ये तीन चित्रीकरणे सुरू असून अनेक जाहिराती, मालिका आणि चित्रपटाचे चित्रीकरण नियमितपणे या चित्रनगरीमध्ये होत आहे. चित्रनगरीमध्ये झालेल्या विविध विकास कामांचा थेट सकारात्मक परिणाम इथल्या रोजगारावर व कलाकार तंत्रज्ञ यांना मिळणाऱ्या विविध संधीवर होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरी, नागरिकांसाठी दिनांक २८ जून रोजी पाहण्यासाठी नि:शुल्क खुली ठेवण्यात येत असल्याने, याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे कोल्हापूर चित्रनगरी मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर चित्रनगरी मार्फत शाहू स्मारक येथे दिनांक २८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता “चित्रसूर्य” या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे असून निवेदन श्रीरंग देशमुख व सीमा देशमुख हे करणार आहेत, या कार्यक्रमामध्ये कार्तिकी गायकवाड, मयूर सुकाळे, अभिषेक तेलंग, माधुरी कुंभार, शेफाली कुलकर्णी, पियुषा कुलकर्णी हे नावाजलेले कलाकार सूर्यकांत यांच्या जीवनावर व त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवर गाण्यांमधून प्रकाश टाकणार आहेत.

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेसाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी संतोष पाटील

भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय…

vishwatmaklokswamivarta

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्धएकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार..

मुंबईतील पवई येथे वेब सिरीज च्या ऑडिशन नावाखाली वीस मुलांना डांबून ठेवून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देणाऱ्या आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या चकमकीत ठार 

vishwatmaklokswamivarta

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा