vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कर्जत तालुक्यातील जुना दगडी पूल वाहतुकीस तात्काळ बंदी

कर्जत तालुक्यातील जुना दगडी पूल वाहतुकीस तात्काळ बंदी

रायगड( प्रतिनिधी:-जव्हार-वाडा-भिवंडी-कल्याण कर्जत या राज्य मार्ग क्रमांक 76 वरील कर्जत तालुक्यातील की.मी. 115/700 या नेरळ पोलिस स्टेशन नजीकच्या जुन्या दगडी बांधकामातील पुलाची स्ट्रक्चरल ऑडिटकरिता पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान कर्जतकडील बाजूस असलेल्या पुलाच्या खांबाच्या तळातील काही भाग नादुरूस्त आढळून आल्याने सदर पुलावरून वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ही तातडीची कार्यवाही करण्यात आली आहे, असे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल संदिप चव्हाण यांनी कळविले आहे.

ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास येताच तात्काळ पाहणी व कार्यवाही करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अखत्यारीतील पुलांची वेळोवेळी नियतकालीक पाहणी करण्यात येत असते. सदर पूल जुना व दगडी बांधकामाचा असल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट नियोजितपणे करण्यात आले होते.

या पुलास समांतर नव्याने बांधलेला दुसरा आसीसी पूल अस्तित्वात असल्यामुळे वाहतूक त्या पुलावरून सुरू ठेवण्यात आली असून सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आहे. सामाजिक माध्यमांवर किंवा काही ठिकाणी “स्थानिक नागरिकांनी कळविल्यानंतरच विभागाने कार्यवाही केली” असा चुकीचा संदेश प्रसारित होत आहे, त्यात कोणताही तथ्याधार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही बाब स्वतःच्या निरीक्षणाद्वारे ओळखून आवश्यक ती सर्व कार्यवाही तात्काळ केली आहे.

०००००००

संबंधित पोस्ट

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

वृक्षतोड परवानगी प्रक्रियेत गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही- वनमंत्री गणेश नाईक

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अधोरेखित, यामुळे एआय-फर्स्ट पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि उच्च-मूल्य असलेल्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल विशाखापट्टणममध्ये गुगलने 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा केली – विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत एआय-चालित सेवांना चालना देण्यासाठी भारतातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त खेळाडूंनी शिबिरात सहभाग घ्यावा

समाजभान असलेला पत्रकार -दीपक एस मठपती….

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी- मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta