vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

श्री स्वामी समर्थ महाराज. गोसाव्याची मनोकामना. (स्वामींच्या लीला )

श्री स्वामी समर्थ महाराज. गोसाव्याची मनोकामना. (स्वामींच्या लीला )

अध्यात्मिक वार्ता

*******************

 स्वामी निद्रेत असतात आणी बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात, तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट भावाने स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात: ” भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानुन, तन मन आणि धन यानं केलेलं समर्पण म्हणझे भक्ती !” तिकडे एक गोसावी जलोधर रोगांनी ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्याच्या पोटात नेहमी कळा निघायच्या. पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती, गोसावी मृत्यू आधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू, असा निश्चय करतो. गोसावी पोट दुखीच्या मर्मान्तक वेदना सहन करत द्वारकेसाठी निघतो. द्वारकेला जातांना रात्री स्वामी, संन्यासाच्या रुपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात-

“क्यो द्वारका जा रहे थे ना ? यहा अक्कलकोट कैसे पहुचे?” गोसावी विस्मित होतो. स्वामी म्हणतात , हमने ही बुलाया था ! खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्या शिवाय आम्ही कसे राहणार? गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होतात. गोसावी धन्य होतो, तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावानी संबोधित करतो. गोसावी म्हणतो ,

 ” माझी इच्छा पूर्ण झाली आहे, आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही.” स्वामी म्हणतात , “ती वेळ अजून आली नाही आहे. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात , “हा पाला रोज वाटून खात जा”. काही दिवसांनी गोसावी येतो व पूर्ण रोग मुक्त झालो अशी स्वामींना सूचना देतो. स्वामी म्हणतात , ‘अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते.’ ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच.मंगळवेढा येथे स्वामी औदुंबराखाली आसनमांडी घालून बसलेले असायचे. गावोगावचे लोक स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत. त्यांच्याजवळ आपल्या अडचणी, मनातील दुःखे मोकळी करायचे. स्वामी प्रत्येकाला दुःख-संकटातून सोडवीत. स्वामींच्या सहवासात लोकांना खूप आनंद मिळत होता. काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला येत. त्या गावात एक कोष्टी रहात होता. तो स्वामींच्या दर्शनाला सकाळ-संध्याकाळ येत असे. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद मिळाला की, आनंदाने तो घरी निघून जायचा. एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, “स्वामी आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले. मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करीत होते. “मी त्यांना सांगितले की, स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाचे दर्शन घेतो.” तेंव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून फक्त हसले. दोन-चार दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कोष्ट्याला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, “माझ्या भक्ता, ह्या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाचे दरबारात वैकुंठवासी झाले. ” ते खूप पुण्यवान म्हणून त्यांचा प्रत्यक्ष विठ्ठलासमोर पंढरपुरात स्वर्गवास झाला. कोष्टी आता पोरका झाला होता. तो अतिशय गरीब होता. भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला. तो महाराजांचे रोज दर्शन व सेवा करीत असे. महाराजांना त्याची खूप दया येत असे. एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले कि , “तुझ्या वडिलांनी त्यांचे पश्चात तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या मागील अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे, ते तू घे व सुखात आनंदात दिवस काढ.” स्वप्न संपले तेंव्हा कोष्टी जागा झाला. त्याला क्षणभर स्वप्नाचा अर्थ कळेना. वडिलांचा स्वर्गवास झाल्याचे वडिलांचा स्वर्गवास झाल्याचे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपणासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे समजले? ह्या गोष्टीचा त्याला विचार पडला. तो मागील अंगणात गेला आणि खणून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला. स्वप्नातील दृष्टांत खरा झाला. त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला. त्यांना साष्टांग नमस्कार घालून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले आणि वर तुळशीचे पान ठेवले. तेंव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, “मला काय करायचे आहे हे धन. वडिलांनी तुझ्यासाठी हे ठेवले आहे. तू त्याचा योग्य वापर करून सुखाने राहा.” परत स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेऊन आनंदाश्रूनी त्यांच्या चरणावर अभिषेक केला. तो कोष्टी पुढे खूप धनसंपन्न तर झालाच परंतु स्वामींकडे येण्याचा त्याचा दिनक्रम कधीच बदलला नाही.

🙏🙏💐प्रस्तुती : श्री वामन रूपरावजी वानरे.मो.9826685695

संबंधित पोस्ट

मारुतिस्तोत्रम् श्रीगणेशाय नम: ॥ ॐ नमो भगवते विचित्रवीरहनुमते प्रलयकालानलप्रभाप्रज्वलनाय । 

vishwatmaklokswamivarta

🚩 !!श्री वडवाळसिध्दनागेश!! 🚩     श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी  श्रीक्षेत्र वडवाळ

🕉 गुरू कुल..प्राचीन काळातील एकेका ऋषींचे आश्रम म्हणजे एकेक ज्ञानपीठ..

vishwatmaklokswamivarta

वीरशैव विकासाचे अग्रगण्य देवत्व देखील आहेत आणि आजही भारतातील कर्नाटक भागात भक्तांद्वारे पूजनीय

vishwatmaklokswamivarta

महाकुंभपर्वातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला ७५ हजारांहून अधिक भाविकांनी दिली भेट..* अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ देशांतील भाविकांनी दिली भेट !* आचारधर्मावर आधारित ग्रंथांकडे भाविकांचा कल !

vishwatmaklokswamivarta

हरितालिका पूजन*☘️🌷