vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

लातूर, प्रतिनिधी : राज्यातील सहकार चळवळीच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना सन 2023-24 या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर राज्य सरकारमार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी सहकारी संस्थांनी 18 जुलै 2025 पर्यंत संबंधित तालुका सहायक निबंध अथवा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.

सहकार पुरस्कारांतर्गत ‘सहकार महर्षी’ (1), ‘सहकार भूषण’ (21) आणि ‘सहकार निष्ठ’ (23) असे एकूण 45 पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, अनुक्रमे 1 लाख, 51 हजार आणि 25 हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. निवड प्रक्रियेत संस्थेची नोंदणी, सभा, नफा-तोटा, थकबाकी, लेखापरीक्षण, निवडणूक, व्यवस्थापन, प्रशिक्षण आदींसाठी 50 गुण, संस्था प्रकारानुसार विशेष निकषांसाठी 35 गुण आणि सहकार चळवळीतील योगदान, जनसेवा, धर्मादाय कार्यासाठी 20 गुणांचा समावेश आहे. पुरस्कारासाठी पात्र संस्थांची अंतिम निवड शासनस्तरीय समितीमार्फत 26 सप्टेंबर 2025 पर्यंत होणार आहे. इच्छुक सहकारी संस्थांनी 2 ते 18 जुलै 2025 या कालावधीत विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तालुका सहायक निबंधक अथवा उपनिबंधक कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी http://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा स्थानिक सहकार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही सहकार आयुक्तांनी कळविले आहे.

****

संबंधित पोस्ट

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य;लाभार्थ्यांसाठी 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती व मिसब्रँडेड औषधसाठ्यांविरुद्ध धडक मोहीम अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी..

पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शना’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन