vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा  उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा

 उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”

राज्य प्रतिनिधी

वरळीतील ऐतिहासिक मराठी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर उभाठा उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती आणि राजकीय स्वाभिमानाच्या मुद्द्यांवर या दोघांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. राज ठाकरे यांच्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आणि ठामपणे सांगितलं, हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही आणि जर मराठीसाठी आवाज उठवणं गुंडगिरी असेल तर होय, आम्ही गुंड आहोत! या भाषणातून त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या, मराठी भाषेवरील हक्क, दिल्ली दरबारी नतमस्तक झालेल्या नेत्यांची लाचारी आणि महाराष्ट्रात मराठीची गळचेपी यावर परखड भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून आपण आजही त्याच विचारांसोबत उभं असल्याचं त्यांनी ठणकावून सांगित

 या: विजयी मेळाव्याच्या मंचावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “पुढे काय होईल सांगता येत नाही, पण ही मराठीची एकजूट अशीच कायम राहावी,” अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.“बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, हीच इच्छा आहे,” असंही त्यांनी भाषणाच्या शेवटी सांगितलं.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं हेच अधिक महत्त्वाचं आहे,” असे मत व्यक्त केले. ठाकरे बंधूंनी एकमेकांबद्दल सकारात्मक भाष्य केल्याने आणि एकत्र येण्याची जाहीर घोषणा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.या मेळाव्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची सुरुवात झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित पोस्ट

नायगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत सिरसाठ दाम्पत्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप**’पे बॅक टू सोसायटी’ भावनेतून सामाजिक बांधिलकी; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

सोमठाणा खुर्द येथील जमीन मोबदल्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोलंबियामधील बुकारामंगा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदके

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश**धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव व नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध*

डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

विधानसभा लक्षवेधी :माथाडी कामगार बोगस नोंदणी तपासणीसाठी विशेष मोहीम- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर