vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविण्यासाठी शिबीरांचे आयोजन

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविण्यासाठी शिबीरांचे आयोजन

सातारा प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत्त अलिम्को या शासनमान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा जिल्हयात ऑन द स्पॉट निःशुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे प्रत्येक तालुक्याच्या गट विकास अधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येणार आहे. तज्ञ पथकाकडून दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्स मोजमाप घेऊन जाग्यावरच वितरण करणार आहेत. या शिबीराचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.

शिबीरांचे आयोजन पुढील प्रमाणे पंचायत समिती, सातारा व जावली २१ जुलै, पंचायत समिती, वाई व खंडाळा २२ जुलै, पंचायत समिती, फलटण २३ जुलै, पंचायत समिती, कोरेगाव २४ जुलै, पंचायत समिती, माण व खटाव २५ जुलै, पंचायत समिती, महाबळेश्वर २६ जुलै , पंचायत समिती, पाटण २८ जुलै व पंचायत समिती, कराड ३० जुलै या ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सातरगावात ‘एचपीव्ही’ लसीकरण विशेष सत्र उत्साहात

मिशन संपूर्ण’ : नॉन पेसा क्षेत्रातील मातांसाठी ‘संपूर्ण’ आहाराची सुविधा*

vishwatmaklokswamivarta

आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनाही राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिन सोहळयाचं निमंत्रण. 

vishwatmaklokswamivarta

रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

vishwatmaklokswamivarta

संसर्गजन्य आजारांबाबत खबरदारी बाळगा- जिल्हाधिकारी स्वामी

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी औषधोपचार मोहिमेला सहकार्य करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta