vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्याप्रदेश

विधान परिषद-: प्रश्नोत्तरे सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

विधान परिषद-: प्रश्नोत्तरे सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तत्कालीन कंत्राटदार नोंदणी नियमानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंता करिता ‘वर्ग-६ चे’ नोंदणी प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. सचिन होले यांनी ‘वर्ग-५ स्थापत्य अभियंता’ नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, चंद्रपूर कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली. तथापि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागीय कार्यालय, वर्धा या कार्यालयाकडून सदर प्रमाणपत्रावर ‘वर्ग-५ स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंता’ असे अनावधानाने टंकलिखित झाले आहे. सचिन होले यांना सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तसेच या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना चंद्रपूर क्षेत्रात कुठलेही कंत्राट देण्यात आलेले नाही, असे पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत सांगितले.

या प्रकरणी सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिले.

सचिन होले यांना दिलेले प्रमाणपत्र आणि त्यांना दिलेली कामे याबाबत सदस्य दादाराव केचे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला

0000

संबंधित पोस्ट

चोपडा शहरातील बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

सामान्य नागरिकांना लवकर न्यायमिळण्यासाठीआवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक-सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते-ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न…

मध्यपूर्व देशांत अडकलेले नांदेडचे ५९ नागरिक सुरक्षित**अडकलेल्या नागरिकांनी ‘नवीन सहाय्यता गल्फ’ लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन*

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार   

स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश 

रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.-  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार