vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करावीत

भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करावीत

           जालना प्रतिनिधी :- भारत सरकारकडून पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती देण्यात येते. तरी सन 2025-26 वर्षामधील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदविण्यासाठी प्राचार्यांनी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करून जास्तीत जास्त अर्ज नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजु एडके यांनी केले.

अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन सादर करण्यासाठी आज दि. 15 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांची सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी सन 2024-25 वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी तसेच महाविद्यालय लॉगिनवर प्रलबिंत असलेले अर्ज तात्काळ पडताळणी करून पात्र अर्ज मंजुर करण्यासाठी तसेच सन 2023-24 मधील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी अभावी विद्यार्थीं लॉगिनला पाठविण्यात आलेले आहेत त्यांना त्रुटी पुर्तता करून रिॲप्लाय करण्यासाठी दि. 31 जुलै 2025 अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. अशी सुचना सर्वांना देण्यात आली.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! – सनातन संस्था

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजनक्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार..

vishwatmaklokswamivarta

सीएसएल’ कोची द्वारा निर्मित पहिले ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट –‘माहे’ नौदलाकडे सोपवण्यात आले

vishwatmaklokswamivarta

पिकांची स्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी शेतात पीक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन