vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणा    — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणा    — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील उद्वाहन तपासणी अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि वेळेवर व्हावी, यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर विधान परिषदेत सांगितले.सदस्य भाई जगताप यांनी नियम ९३ अन्वये राज्यातील उर्जा विभागाच्या विद्युत आणि उद्वाहन निरीक्षक कार्यालयाकडून होणाऱ्या उद्वाहन तपासणीसंदर्भात सूचना मांडली होती.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रात एकूण २,१७,६५२ लिफ्ट्स कार्यरत असून, उच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबर २०१२ रोजीच्या आदेशानुसार वर्षातून एकदा या लिफ्ट्सची तपासणी होणे बंधनकारक आहे. यापूर्वी ही जबाबदारी फक्त २ विद्युत निरीक्षकांच्या अधिपत्याखालील १२ सहाय्यक निरीक्षक आणि ३० अभियंत्यांवर होती, मात्र हे मनुष्यबळ अत्यल्प असल्यामुळे तपासणी प्रक्रिया मर्यादित प्रमाणातच होत होती.

२८ एप्रिल २०२५ पासून लिफ्ट तपासणीच्या सेवांचे विकेंद्रिकरण केले आहे. आता ४० विद्युत निरीक्षक, ७८ सहाय्यक विद्युत निरीक्षक आणि ३९७ सहाय्यक अभियंते या कामात सहभागी झाले असून एकूण २८८ अधिकाऱ्यांची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. तसेच तपासणीची गती वाढवण्यासाठी यापूर्वी कार्यरत असलेल्या ७१ अधिकाऱ्यांचे इतर गरजेच्या ठिकाणी समायोजन करण्यात येणार असून, यासाठी आवश्यक निर्णय पुढील ८ ते १५ दिवसांत घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे उद्वाहन वापरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा नव्हे, तर दोनदा तपासणी करण्याचाही विचार करता येईल, असेही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

0000

संबंधित पोस्ट

जमीन महसूल वसुलीसह फेरफार प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया-विविध विकासकामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या विषयावर‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा विशेष संवाद..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी गती!विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना मिळणार चालना दावोस 2025 मध्ये स्वाक्षरी झालेल्या 51 करारांपैकी 17 ला मंजुरी,एकूण गुंतवणूक ₹3,92,056 कोटी

विकसित भारत – रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण (VB-GRAMG) अभियानाचा भिवंडी येथे जिल्हास्तरीय शुभारंभग्रामीण कुटुंबांना १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी; आत्मनिर्भर आणि समृद्ध गावांच्या निर्मितीकडे महत्त्वपूर्ण पाऊल

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta