vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025

ठाणे, प्रतिनिधी:- शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण-2022/प्र.क्र.106/टिएनटि-1, दि.02 मे 2025 अन्वये तसेच या कार्यालयाचे प्रसिद्धी निवेदन दि.03 मे 2025 अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे. विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते.

तरी उपरोक्त प्रमाणे उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास ई-मेलद्वारे / पोस्टाद्वारे / हस्तपोच सादर करतांना “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक व बैठक क्रमांक नमूद करावा किंवा https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकमध्ये माहिती भरून विहित मुदतीत सादर करावी. जेणे करून ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांनुसार त्यांचे गुणपत्रक (SCORE CARD) देण्यात येईल.

सबब विहीत मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास ई-मेलद्वारे / पोस्टाद्वारे / हस्तपोच किंवा https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहिल. तद्नंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी विद्याथ्यांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -04 आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होणार

चेंबूर येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर चौघे विद्यार्थी जखमी,महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात दिली भेट जखमींची केली विचारपूस; मृत विद्यार्थ्याच्या पालकांप्रती संवेदना व्यक्त करून दिला धीर घटनेच्या चौकशीचे दिले निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

कुचीत विकसित कृषि संकल्प अभियान उत्साहात संपन्न

विकसित भारताला अधिक सशक्त बनवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- मंत्री जयकुमार रावल…

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील मदतमाश इनाम जमिनी भोगवटदार वर्ग-2 मधुन वर्ग-1 करणे बाबत पात्र खातेदारांना आवाहन..